Deepke's Father Is Not Even Allowed In The CJP Meeting; Not A Political Party, But A Pressure Group Will Do It, The Party's Direction Was Decided At The National Meeting At Deepke's Residence In Chhatrapati Sambhajinagar देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सीजेपी (कॉक्रोच जनता पार्टी) राजकीय पक्ष स्थापन करणार नाही. त्याऐवजी दबावगट म्हणून काम करणार, असे सीजेपीतर्फे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. न्यायव्यवस्था, मीडिया आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या सं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या वाळूज येथील निवासस्थानी मंगळवारी रात्री अडीच वाजेपर्यंत आणि बुधवारी सकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची राष्ट्रीय बैठक झाली. या वेळी पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास, यतीन गोयल, वैष्णवी गौर, रत्ना सिंग, अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका, अनिकेत भारद्वाज, दीपक बनियानो आणि विजय मल्लागी उपस्थित होते. दिपकेंचे वडील : मी खालच्या खोलीत, वर बैठक सुरू होती दिपकेंचे वडील भगवानराव यांनाही बैठकीत प्रवेश नव्हता.
ते म्हणाले की, वरच्या मजल्यावरील खोलीत बैठक सुरू होती. मी खालच्या मजल्यावरील खोलीत होतो. इंधन दर, बेरोजगारी, आर्थिक संकटावरही केली चर्चा दिपके म्हणाले, लोकांच्या अपेक्षा वाढल्याने संघटन वाढीवर मंथन करत आहोत. त्याचा रोडमॅप, इंधन दर, बेरोजगारी, आर्थिक संकटावर सखोल चर्चा सुरू आहे. झारखंडच्या विद्यार्थ्यांनाही आमचे पूर्ण समर्थन आहे. सोनम वांगचुक सीजेपीचे मार्गदर्शक म्हणून कायम असतील. सकाळी सरकार एकाचे, तर संध्याकाळी दुसऱ्याचे असते दिपके म्हणाले, आज जनता सकाळी एका पक्षाला मतदान करते, तर संध्याकाळी भलत्याच पक्षाचे सरकार असते. आमदार किंवा खासदार दुसऱ्याच पक्षात गेलेला दिसतो. ईडी अन् सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडले जात आहेत. यामुळे देशभरातील जनता कमालीची त्रस्त झाली आहे.