Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

व्यवस्थेचे बोललो असेल ते विसरून जा, करमाळ्याच्या विकासाचे लक्षात आहे

निवडणुकीच्या काळात विकासकामांच्या बाबतीत जे बोललो ते सत्य आहे. इतर काही गोष्टी व्यवस्था म्हणून बोललो असेल तर त्या विसरून जा. मात्र करमाळा शहराच्या विकासाबाबत बोललेल्या गोष्टींचा मला कधीही विसर पडणार नाही. असे त्यांनी सांगितले. करमाळा शहरातील भवानी नाका येथील छत्रपती चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा व स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 21) करण्यात आले.

व्यवस्थेचे बोललो असेल ते विसरून जा, करमाळ्याच्या विकासाचे लक्षात आहे

Forget About The System, We Are Thinking About The Development Of Karmala, We Promise To Resolve The Issues Of Water Supply, Roads And Boundary Extension Of Karmala. निवडणुकीच्या काळात विकासकामांच्या बाबतीत जे बोललो ते सत्य आहे. इतर काही गोष्टी व्यवस्था म्हणून बोललो असेल तर त्या विसरून जा. मात्र करमाळा शहराच्या विकासाबाबत बोललेल्या गोष्टींचा मला कधीही विसर पडणार नाही. असे त्यांनी सांगितले. करमाळा शहरातील भवानी नाका येथील छत्रपती चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा व स्मारकाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी स्मारकाच्या उभारणीसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन गोरे यांनी दिले.

नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी आपल्या भाषणात पुतळ्यासाठी आणखी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शहरासाठी 90 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, रस्त्यांसाठी निधी आणि शहराची हद्दवाढ करण्यास मंजुरी मिळावी, अशा मागण्या पालकमंत्र्यांकडे केल्या. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत करमाळा तालुक्यासह शहरातील विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

पुतळा व स्मारकासाठी निधीची कोणतीही मर्यादा नाही. स्मारकासाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेत्या रश्मी बागल, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, भाजपचे पदाधिकारी, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. छत्रपती चौकात 46 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले. शहरात एक कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचेही भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पुतळ्यासाठी सुरुवातीला 46 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री गोरे यांनी कामाच्या व्याप्तीनुसार आवश्यक तेवढा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. स्मारक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पताका असलेला भगवा ध्वज उभारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा