Fraud By Opening Fake Bank Accounts, 6 Relatives Arrested, Two Absconding, Rations Embezzled Under The Name Of E KYC, Valuables Worth Rs 12 Lakh Seized रेशन कार्डचे ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणे बंद होईल, अशी खोटी भीती दाखवून तब्बल 300 हून अधिक नागरिकांचे आधारकार्ड, बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन आणि फेस ऑथेंटिकेशनचा गैरवापर करून बनावट सिमकार्ड आणि बँक खाती उघडणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून नातेपुते पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील 300 हून अधिक नागरिकांची ई-केवायसीच्या नावाखाली माहिती घेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक तसेच फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमकार्ड काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकानदार वर्धमान ऊर्फ लाला वसगडेकर (रा. नातेपुते) याने रेशन दुकानदार असल्याचा फायदा घेत नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याचे साथीदार ईश्वर शेट्टी, प्रशांत पांडुरंग साठे, वैभव शिंदे, हरिराम काशीनाथ जाधव, ऋषभ बाळासाहेब मोहिते, दत्ता शिंदे व दादा निंबाळकर यांच्या मदतीने ई-केवायसीच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती दिसत आहे. बँक खात्याची माहिती देऊ नये ई-केवायसीच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक व बायोमेट्रिक माहिती घेऊन तिचा गैरवापर केला जात आहे. नागरिकांनी आपला आधार, मोबाइल व बँक खात्यांशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये.
या गुन्ह्यात वर्धमान ऊर्फ लाला वसगडेकर, प्रशांत पांडुरंग साठे, हरिराम काशीनाथ जाधव, ऋषभ बाळासाहेब मोहिते, दत्ता शिंदे आणि दादा निंबाळकर या सहा आरोपींना अटक केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्याबाबत पुढील तपास सुरू आहे. तपासात आरोपींनी मोबाईल सिमकार्ड, पेमेंट बँकिंग अॅप्स तसेच बँक खाती उघडून त्यांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन व्यवहारांचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अॅप्सचा उपयोग केला आरोपींनी वोडाफोन-आयडिया कंपनीची सुमारे 250 सिमकार्ड काढल्याचे निष्पन्न झाले आहे. या सिमकार्डचा वापर जिओ पे, एनएसडीएल पे आणि एअरटेल पे यांसारख्या ऑनलाइन पेमेंट अॅप्सशी जोडून ऑनलाइन आर्थिक व्यवहार व फसवणूक करण्यासाठी झाल्याचे तपासात आढळून आले आहे. जीपीएस मशीन केले जप्त पोलिसांनी कारवाई दरम्यान 3 लॅपटॉप, 5 बायोमेट्रिक सिस्टीम, 7 मोबाईल फोन, 1 जीपीएस मशीन, महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही-300 वाहन (अंदाजे 10 लाख रुपये) आणि 39 हजार रुपये रोख रक्कम, असा अंदाजे 12 लाख 15 हजार.