Jayakwadi Dam At 85.24 Percent; Warning To 172 Villages Along Godavari, 32 Thousand Cusecs Inflow; First Discharge From The Dam On August 4 Last Year जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत धरण 85.24 टक्के भरले असून पाण्याची मोठी आवक पाहता मुख्य दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे आणि म रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, धरणात 1,843.052 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची पाणीपातळी 1519.12 फुटांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 32,931 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. सद्य:स्थितीत उजव्या आणि डाव्या कालव्यातून एकूण 1,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनाने सांडव्यावरून पाणी सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे. धरणातील पाण्याची आवक बघून दरवाजे उघडण्याचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून घेतला जाईल. ग्रामस्थांनी नदीपात्रात जाणे किंवा पाण्याजवळ वावरणे पूर्णपणे टाळावे. -गणेश हासे, कार्यकारी अभियंता कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा राज्याच्या बहुतांश भागात रविवारी पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 3 ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते काही ठिकाणी पाऊस पडेल.
गतवर्षी याच दिवशी म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी जायकवाडीत 91.36 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर 2 दिवसांत धरण 95 टक्क्यांवर आल्यानंतर दरवाजे उघडले होते. यंदा मान्सूनचे उशिरा आगमन आणि एल निनोचे संकट असतानाही ऑगस्टच्या सुरुवातीलाच धरणाने 85 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. हा मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा दिलासा ठरला. गतवर्षी 91.36 टक्के उपयुक्त साठा प्रमुख धरणांतील पाणीसाठा प्रकल्प आजचा गतवर्षी जायकवाडी 85.24% 91.36% मांजरा 16.51% 29.96 % माजलगाव 16.99% 20.14 % निम्न तेरणा 26.76% 74.01% येलदरी 58.22% 78.71% दारणा 85.93% 86.89% भंडारदरा 94.43% 86.75% मुळा 67.58% 86.49% राधानगरी 99.34% 98.84% कोयना 86.07% 81.68% उजनी 97.57% 98.23% गोसीखुर्द 64.93% 42.20% अर्धवट नाही! वाचा पूर्ण!
