Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

सामाजिक उपक्रमाबरोबरच वृक्षारोपणास गती द्यावी

प्रत्येक गणेश मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत. तसेच प्रत्येकांनी एक झाड लावून वृक्षारोपण उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन करकंब पोलीस स्टेशनचे श्याम गायकवाड यांनी केले. करकंब येथील आंबे मळा वस्तीवरील विघ्नहर्ता प्रतिष्ठानने गणेश उत्सवा निमित्ताने इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्ताक्षर व वकृत्व या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धा अमोल पब्लिक स्कूल मध्ये घेण्यात आल्या.

सामाजिक उपक्रमाबरोबरच वृक्षारोपणास गती द्यावी

Along With Social Activities, Tree Plantation Should Be Accelerated, Said Shyam Gaikwad During The Prize Distribution Ceremony Of Competitions Organized By Vighnaharta Pratishthan In Karakamba. प्रत्येक गणेश मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत. तसेच प्रत्येकांनी एक झाड लावून वृक्षारोपण उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन करकंब पोलीस स्टेशनचे श्याम गायकवाड यांनी केले. करकंब येथील आंबे मळा वस्तीवरील विघ्नहर्ता प्रतिष्ठानने गणेश उत्सवा निमित्ताने इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्ताक्षर व वकृत्व या स्पर्धांचे आयोजन केले होते.

या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धा अमोल पब्लिक स्कूल मध्ये घेण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर पोलिस अधिकारी लक्ष्मण भांगे, वैभव शिंदे, विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सलगर, सचिव अमोल खपाले, प्रा. किसन सलगर, शिवाजी सलगर, दत्तात्रय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धांचे परिक्षण दत्तात्रय खंदारे, लक्ष्मण जाधव, संजय सांगोलकर यांनी केले.

यासाठी सुनिल जाधव, उल्हास खपाले, शिवाजी सलगर, महेश चौगुले,तानाजी सलगर, महेश जाधव, अमोल खपाले, सुनील सलगर, प्रा. किसन सलगर, वैभव जाधव तसेच शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू जाधव यांनी तर आभार प्रा. किसन सलगर यांनी मानले.

वकृत्व स्पर्धा : पहिली ते चौथी- श्रवण तानाजी नरसाळे (प्रथम), वेदश्री सचिदानंद लिगाडे, ईशा विनोद पवार व आरोही शिवाजी लोखंडे. .इयत्ता पाचवी ते आठवी - आरोही विनोद पवार, आदिती अनिल कवडे, खनिका विशाल सोलंकी व प्रांजल नारायण खपाले..  इयत्ता नववी ते बारावी- सायली महादेव जगताप, ज्ञानेश्वरी हनुमंत वसेकर, मैथिली साधू गावडे व सूर्या सदाशिव शिंदे. सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण शाळा इयत्ता पहिली ते चौथी- गौरी सुनिल महामुनी, समृद्धी महादेव चंदनशिवे, तनिष्का स्वप्निल शहा, वेदिका बाळासाहेब हेगडकर. इयत्ता पाचवी ते आठवी - श्रेया ज्ञानेश्वर नरसाळे, अथर्व किरण महामुनी, श्रेया विजय शितोळे व शौर्य दत्तात्रय दुधाणे. इयत्ता नववी ते बारावी गट - वैष्णवी हनुमंत वसेकर, निसर्ग दिपक जाधव, पायल विजय मुळे व ज्ञानेश्वरी हनुमंत वसेकर. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा