संत नगरी मंगळवेढा शहरातील पहिले गणेशोत्सव मंडळ म्हणून परिचित असणारे सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवलेले गणेशोत्सव मंडळ म्हणजे नवरंग युवक गणेशोत्सव मंडळ होय. या मंडळाची स्थापना सन 1968 मध्ये झाली. मंडळाचे एकोणसाठावे वर्ष आहे, त्यावेळेचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै गौरीशंकर वठारे हे होते, सदर मंडळाचे समितीमध्ये स्वर्गीय बंडा मोडक, दामोदर दत्तू, चंद्रकांत किल्लेदार, निवृत्ती डोरले, सुकदेव जावळे, रामचंद्र चेळेकर, भाऊ चेळेकर, धोंडीराम राऊत, डॉ. बी. पी. देशमुख, बाबू लेंडवे, चंद्रकांत वेदपाठक पेंटर, लक्ष्मण चेळेकर, राजेंद्र भगरे हे होते व मंडळाचे मार्गदर्शक म्हणून आण्णाराव चेळेकर होते. यातील अनेक जण हयात नाहीत मात्र त्यांचे विचार व प्रेरणा घेऊन हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे. या मंडळाने स्थापनेपासून अंदाजे तीन ते चार वेळा रक्तदान शिबिर घेतले होते, यामध्ये जवळपास 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
दरवर्षी मंडळ डॉल्बी किंवा बेंजो न वाजवता पारंपरिक बँड आणला जातो. मंडळ वर्गणी गोळा करीत नाही, मंडळातील सदस्य व गल्लीतील सर्व कुटुंब व दुकानदार हे आपापल्या परीने स्वतः होऊन मंडळाला मदत करतात. पूर्वी दोन वर्षांनंतर गणेशाची मूर्ती नवीन आणली जात असे आत्ता गेल्या चार वर्षापासून एकच मूर्ती आहे. सध्या अध्यक्ष म्हणून सचिन बडोदकर हे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत ,खजिनदारपद निर्माण झाल्यापासून दादा टाकने पंधरा वर्षे खजिनदार होते. आशुतोष चेळेकर खजिनदार म्हणून काम पाहत आहेत. मंडळाने स्वच्छता अभियान राबवणेत आले. पंचविसाव्या व पन्नासाव्या वर्षी रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम एड्स जनजागृती मोहीम, रक्तदान शिबिर, बौद्धिक व्याख्यानमाला, सायकल स्पर्धा फणी गेम्स आदी विविध स्पर्धा राबवण्यात आल्या आहेत. ^मंगळवेढा शहरातील पहिले मंडळ असून, जुन्या जाणत्या लोकांनी एकत्र येऊन हे नवरंग युवक गणेशोत्सव मंडळ उभा केली. यावर्षी वृक्षारोपण व रक्तदान शिबिर घेत आहोत. सामाजिक उपक्रम राबवत आहे.
सचिन बडोदकर,
अध्यक्ष, नवरंग गणेशोत्सव मंडळ मंगळवेढा