In The Next Reel, Prime Minister Modi Should Apologize To The Students Who Were Lathi charged Deepke, Angered By The Inhuman Beating By The Police, 'apology Should Not Be Limited To Just The 'reel' राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी संसद भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावरून आता मोठा वाद पेटला आहे. याप्रकरणी अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पोलिस प्रशासन आणि कें या निर्दयी कारवाईचा बळी ठरलेल्या विद्यार्थिनींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुढील व्हिडिओत जाहीर माफी मागावी, अशी आक्रमक मागणी दिपके यांनी केली आहे. ‘नीट’ परीक्षेतील कथित अनियमितता आणि घोटाळ्यांविरोधात 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसद भवनावर मोर्चा काढला होता.
यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला होता. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी एका व्हिडिओद्वारे जंतर-मंतरवरील आंदोलनात आपल्या आणि आपल्या दिवंगत मातोश्रींवर टिप्पणी करणाऱ्या ‘भरकटलेल्या तरुणांना’ माफ करत असल्याचे म्हटले होते. यावर निशाणा साधत दिपके यांनी थेट सवाल केला आहे की, “पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना केवळ सोशल मीडियावरील ‘रील’ पुरतेच माफ करणार आहेत, की त्यांच्यावर दाखल झालेले पोलिसांचे गुन्हेही मागे घेतले जाणार आहेत? या बोचऱ्या प्रश्नामुळे आता नवी चर्चा सुरू झाली आहे. मोदींनी मुलीचे पालकत्व घेण्याचे मुलीच्या आईचे आवाहन नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवीगाळ करणाऱ्या मुलीला क्षमा करत औदार्य दाखवले. या निर्णयानंतर मुलीच्या आईने मोदींचे आभार मानले. मुलीच्या चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत तिने मोदींनीच आता आपल्या मुलीचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन केले. अर्धवट नाही! वाचा पूर्ण!
