Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

गावामध्ये झाडे लावाल तरच पाऊस येणार

गावात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घ्या, झाडे लावलात तरच पाऊस येणार आहे. नाही तर दुष्काळासारख्या कठीण परस्थिती सामोरे जावे लागणार असल्याचे मत पाटोदाचे आदर्श सरपंच संकल्पनेचे प्रणेते भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गणेशोत्सवानिमित्त आदर्श गाव संकल्पनेवर प्रेरणादायी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. करजगीचे सरपंच विवेकानंद उंबरजे आणि दयानंद उंबरजे यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले. आपल्या व्याख्यानात पेरे-पाटील यांनीआदर्श गावाची संकल्पना, ग्रामविकासातील ग्रामस्थांची भूमिका, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

गावामध्ये झाडे लावाल तरच पाऊस येणार

Rain Will Come Only If Trees Are Planted In The Village, Pere Patil Appeals To Village Administrators In Ganeshotsav Lecture In Karajagi गावात झाडे लावण्याचा उपक्रम हाती घ्या, झाडे लावलात तरच पाऊस येणार आहे. नाही तर दुष्काळासारख्या कठीण परस्थिती सामोरे जावे लागणार असल्याचे मत पाटोदाचे आदर्श सरपंच संकल्पनेचे प्रणेते भास्करराव पेरे-पाटील यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे गणेशोत्सवानिमित्त आदर्श गाव संकल्पनेवर प्रेरणादायी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. करजगीचे सरपंच विवेकानंद उंबरजे आणि दयानंद उंबरजे यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले.

आपल्या व्याख्यानात पेरे-पाटील यांनीआदर्श गावाची संकल्पना, ग्रामविकासातील ग्रामस्थांची भूमिका, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी बाबुराव पाटील गौडा, पंचायत समिती सभापती रश्मी सागर हिप्परगे, जिल्हा परिषद सदस्य विकास शिवसिद्ध बुळ्ळा, पंचायत समिती सदस्य उत्तम वाघमारे, आप्पासाहेब किवडे, ग्रामसेवक काशिनाथ नागप्पा गोंगडे, उपसरपंच शब्बीर पटेल यांच्यासह तालुक्यातील 40 ते 50 सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. दयानंद उंबरजे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अक्कलकोट व मैंदर्गी नगरपरिषदांचे सदस्य, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा