येणकी (ता. मोहोळ) येथे नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मागील 13 वर्षांपासून येणकी, वटवटे, मिरी, येणकी, इंचगाव व सोहाळे या गावातील समाजबांधव एकत्रित येऊन जयंती उत्सव साजरी केली जाते. यंदाही जयंती निमित्त कीर्तन, प्रवचन, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी जकराया शुगरचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य सचिन जाधव यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जाधव यांनी गावातील बालकांवर आध्यात्मिक संस्कार, व्हावेत, यासाठी वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यासाठी मृदंगाचार्य, हार्मोनियमाचार्य व आध्यात्मिक शिक्षकांची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. या वेळी सचिन जाधव यांच्यावतीने भागातील 51 समाजबांधवांना श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमांचे वाटप केले. वेळी संयोजक हेमंत वाघमारे, रघुनाथ वाघमारे, कृष्णा वाघमारे, बाळाप्पा वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, दादासाहेब वाघमारे, मनोजकुमार वाघमारे आदी उपस्थित होते.
Source: Maharashtra
ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा