Government Awards Maharshi Factory For High Sugar Yield, Awards Distributed At A Function In New Delhi सहकारमहर्षी साखर कारखान्याने गतवर्षीच्या हंगामात ऊस विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली या संस्थेने ऊस विकासाकरिता उच्च साखर उतारा विभागातून सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कार्यक्षमता तृती हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, गुजरातचे सहकार मंत्री गुरजर, हरियाणाचे मंत्री डॉ.अरविंद कुमार शर्मा, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश नाईकनवरे व इतर मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी इशिता धैर्यशील मोहिते-पाटील, व्हाइस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, संचालिका सुजाता शिंदे, कार्यकारी संचालक सुहास यादव व मुख्य शेतकी अधिकारी रविराज चव्हाण उपस्थित होते. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर असून सदर पुरस्काराने कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
Source: Maharashtra
ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा