Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी

कथित भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथील एका शिक्षण संस्थेत करमाळा पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र, पोलिसांनी अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिगवण जवळील शिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी ही सकाळपासून रात्री उशिरा पर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम होती. तसेच संस्थेशी संबंधित प्रा. राजेंद्र हुंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

शिक्षण संस्थेची झडती; सोमवारपासून तपासणी

Educational Institution Raided; Investigation From Monday, Financial "scam" With Fraudster Manohar Bhosale कथित भोंदूबाबा मनोहरमामा भोसले यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथील एका शिक्षण संस्थेत करमाळा पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून चौकशी व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिगवण जवळील शिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी ही सकाळपासून रात्री उशिरा पर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम होती. तसेच संस्थेशी संबंधित प्रा. राजेंद्र हुंबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून कोणती माहिती घेण्यात आली किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवरच संस्थेतील कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात असल्याची चर्चा आहे. भोंदू मनोहरमामा भोसले याच्याशी संबंधिताचे कथित आर्थिक संबंध असल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या भोंदूबाबाच्या आर्थिक गैरव्यवहारात करमाळा येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा पोलिसांच्या तपासात संशय निर्माण झाला आहे. या संस्थेशी झालेले आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याने पोलिसांनी सदर शिक्षण संस्थेला नोटीस दिली. संकेत संतोष काळे (वय 22, रा. इंदापूर) आणि प्रा. राजेंद्र हुंबे (रा. मांजरगाव, ता.करमाळा) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने संकेत काळे याला सात दिवसांची तर प्रा. राजेंद्र हुंबे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा