Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव

आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांची किंमत मुलांनी ओळखली पाहिजे, या आशयाच्या विचारांनी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या भावनिक आणि प्रेरणादायी विचारांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. जवळगाव दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळगाव नं. 2 येथे ‘बाप समजून घेताना’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांच्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाज मुलानी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

‘बाप समजून घेताना’ व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना वडिलांच्या त्यागाची जाणीव

आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांची किंमत मुलांनी ओळखली पाहिजे, या आशयाच्या विचारांनी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या भावनिक आणि प्रेरणादायी विचारांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांच्या कष्टांची जाणीव करून देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. जवळगाव दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळगाव नं. 2 येथे ‘बाप समजून घेताना’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांच्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाज मुलानी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमास अभिमन्यू चव्हाण, अक्षय चव्हाण, नेताजी गांधले, चंद्रकांत ढेंगळे, रितेश कापसे, बळीराम कापसे, अक्षय कापसे, नवाज मुलानी, मुजमेल पठाण, काकासाहेब ढेंगळे, आंबऋषी कापसे, ज्ञानेश्वर कापसे,यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. सोमनाथ चव्हाण यांनी आभार मानले. प्रा. वसंत हंकारे यांनी आई वड वड प्रेम, वडिल ांचा संघर्ष, मुलांच्या उज्ज्वल भवितव् यासाठी वडील घेत असलेले कष्ट आणि त्याग यावर प्रभावी मार्ग दर्शन केले. वडीलांचे कष्ट आणि त्याग यावर प्रभावी मार्गदर्शन

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा