Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट

कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील बेंद ओढ्यावर सुमारे 2 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करत नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाब विचारूनही, विरोध डावलून बांधकाम विभागाने ठेकेदाराला 99 लाख 4 हजार रुपयांचे बिल अदा केले. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ​राज्य शासनाच्या नगरपरिषद नागरिक सेवा व सुविधा योजनेअंतर्गत या पुलासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी 1 कोटी 99 लाख 96 हजारांच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळून हे काम अक्षय बागल या एजन्सीला देण्यात आले. ​नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेविका भाग्यश्री पाटील व नगरसेवक ऋषीपाल वाल्मीकी यांच्यासह इतर सदस्यांनी या कामातील गोंधळाबाबत मुख्याधिकाऱ्यांना थेट जाब विचारला होता. काम व्यवस्थित तपासून मगच निर्णय घेण्याची मागणी केली असतानाही बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला 99,04,769 इतकी रक्कम अदा केली.

कुर्डुवाडी-टेंभुर्णी पुलाचे काम निकृष्ट

कुर्डुवाडी-टेंभुर्णी रस्त्यावरील बेंद ओढ्यावर सुमारे 2 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप करत नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाब विचारूनही, विरोध डावलून बांधकाम विभागाने ठेकेदाराला 99 लाख 4 हजार रुपयांचे बिल अदा केले. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य शासनाच्या नगरपरिषद नागरिक सेवा व सुविधा योजनेअंतर्गत या पुलासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी 1 कोटी 99 लाख 96 हजारांच्या रकमेला प्रशासकीय मान्यता मिळून हे काम अक्षय बागल या एजन्सीला देण्यात आले.

नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेविका भाग्यश्री पाटील व नगरसेवक ऋषीपाल वाल्मीकी यांच्यासह इतर सदस्यांनी या कामातील गोंधळाबाबत मुख्याधिकाऱ्यांना थेट जाब विचारला होता. काम व्यवस्थित तपासून मगच निर्णय घेण्याची मागणी केली असतानाही बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला 99,04,769 इतकी रक्कम अदा केली. यामुळे नगरसेवकांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, दोषींवर फौजदारी करा "प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास आगामी नगरपरिषद सभेत हा विषय लावून धरू.

तसेच जिल्हाधिकारी व मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेच्या नगरसेविका वनिता सातव यांनी दिला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका वनिता सातव यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन निकृष्ट दर्जाचे बांधकाम तत्काळ थांबवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून परवाना रद्द करावा. आतापर्यंत अदा केलेली 99 लाखांची रक्कम तत्काळ वसूल करण्यात यावी, अशा मागण्या केल्या आहेत. "बेंद ओढ्यावरील पुलाचे काम हे इस्टिमेटप्रमाणेच सुरू आहे. संबंधित एजन्सीधारकाला नियमानुसार जीएसटीसह 99 लाख 4 ,769 रुपयांचे बिल अदा केले आहे. अभिजित मोहिते , नगर अभियंता कुर्डुवाडी "प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असून भविष्यात दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे ठाकरे सेनेचे गटनेते ऋषीपाल वाल्मीकी यांनी केला. नियमाप्रमाणे बांधकाम नाही : पुलाचे फुटिंग कागदोपत्री 15×87 फूट खोदल्याची नोंद आहे.

मात्र प्रत्यक्ष जागेवर तसे काम झाले नसल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य : अंदाजपत्रकानुसार पूर्ण क्षमतेचे स्टील आणि योग्य दर्जाचे सिमेंट वापरले जात नसून फुटींगचे काम दर्जाहीन झाले आहे. भविष्यात पुराचा धोका :पावसाळ्यात बेंद ओढा तुडुंब भरून वाहतो. अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्यास पूरस्थितीत हा पूल टिकणार नाही. बेंद ओढ्यावर सुरू असलेल्या पुलाचे झालेले बांधकाम दिसत आहे. ते निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा