Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत

महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा धंगेकर यांनी जाहीर निषेध नोंदवला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशा वाचाळ नेत्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत

महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा धंगेकर यांनी जाहीर निषेध नोंदवला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशा वाचाळ नेत्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कारनामे दररोज पुराव्यांसकट सोशल मीडियावर जनतेसमोर आणू, असा खणखणीत इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे.

धंगेकरांची X वरील पोस्ट काय? रवींद्र धंगेकर म्हणाले की, आज जी भाजप सत्तेत आहे ती सगळी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची कृपा आहे.आज जर राज्यातील लोकप्रिय आमदारांची लिस्ट केली तर आदरणीय उदयजी सामंत व शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यात अव्वल आहेत.त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरुद्धची वक्तव्ये थांबवावी. आमचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा मी जाहीर निषेध करतो. अशी आक्षेपार्ह विधाने आम्ही कधीच खपवून घेणार नाही. कोणामुळे सत्ता आली हे लक्षात ठेवा रवींद्र धंगेकर म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरू केली. या योजनेमुळे भाजपसह महायुतीचे सर्व आमदार निवडून आले. याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना जाते, हे वारंवार आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वाचाळ भाजपच्या नेत्यांनी ध्यानात घ्यावे.

हा प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा केविलवाना प्रयत्न रवींद्र धंगेकर म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी, उद्योग वाढीसाठी सतत झटणारा नेता अशी उदय सामंत यांची जनमाणसात प्रतिमा आहे. त्यांनी कायमच जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले आहे. अशा नेत्यांवर आक्षेपार्ह विधान करून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा हा चौधरी आणि पटेल यांचा केविलवाना प्रयत्न दिसतो आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशा वक्तव्याची दखल घेऊन, पक्षशिस्त न पाळणाऱ्या संबंधितांस योग्य तो जाब विचारावा. अन्यथा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कारनामे पुराव्यांसकट दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणू.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा