Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

पुढील 100 वर्षे हेच कार्यालय आर्थिक व्यवस्थेचा कणा राहील

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत 'नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या (NUCFDC) नवनिर्मित कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी अर्बन बँकिंग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर भर दिला. ते म्हणाले, "आम्ही अर्बन बँकिंग क्षेत्राला अधिक विकसित करत असून बँकिंग सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक होणार आहेत. या 'अम्ब्रेला' संस्थेमुळे अर्बन बँकिंगचा मोठा विस्तार होईल आणि पुढील 100 वर्षांपर्यंत हेच कार्यालय शेअर बाजाराचा कणा म्हणून काम करेल." तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले.

पुढील 100 वर्षे हेच कार्यालय आर्थिक व्यवस्थेचा कणा राहील

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत 'नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या (NUCFDC) नवनिर्मित कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी अर्बन बँकिंग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर भर दिला. ते म्हणाले, "आम्ही अर्बन बँकिंग क्षेत्राला अधिक विकसित करत असून बँकिंग सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक होणार आहेत. या 'अम्ब्रेला' संस्थेमुळे अर्बन बँकिंगचा मोठा विस्तार होईल आणि पुढील 100 वर्षांपर्यंत हेच कार्यालय शेअर बाजाराचा कणा म्हणून काम करेल." तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले. 1400 सहकारी बँकांमध्ये 6 लाख कोटींच्या ठेवी; अर्बन बँकिंग अधिक सक्षम करणार- शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या बळकटीकरणावर भर देताना देशातील सुमारे 1,400 शहरी सहकारी बँकांमध्ये तब्बल 6 लाख कोटी रुपयांचा निधी जमा असल्याचे सांगितले.

लहान सहकारी बँकांमधील कर्जवसुलीचा दर शंभर टक्क्यांच्या जवळपास असल्याचे नमूद करत त्यांनी अर्बन बँकिंग अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्याबरोबरच सायबर सुरक्षेला बळ देण्यासाठीही व्यापक उपाययोजना सुरू असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. मुंबईत अमित शहा-फडणवीस यांची भेट दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात जाऊन त्यांची भेट घेतली. शहांच्या दौऱ्यामुळे धरपकड मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपल्याला अमित शहांच्या दौऱ्यामुळे अटक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून हा आरोप केलाय. ते म्हणाले की, 'देशामध्ये आणिबाणीची घोषणा झालीय. देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आहेत. मात्र, राहुल गांधी यांचे जितके शिपाई आहेत, त्यांना पकडण्यात येत आहे. आज मला अट करण्यासाठी माझ्या घरीही मुंबई पोलिस आले आहेत. अमित शहा मुंबईत आले म्हणजे लोकांना बाहेर पडणे अडचणीचे आहे.' काँग्रेस लढाई लढणार अखिलेश यादव पुढे म्हणाले की, ‘अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना मला सांगायचे आहे की, भिऊ नका. तुम्ही जंतरमंतरवर पॅलेट गन चालवली. तुम्ही मुलांना काठीने मारले. तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केला. तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल. तुम्ही वाचू शकत नाही. तुम्हाला वाचू देणार नाही.

आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी, या देशाचे भविष्य वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तुमच्याविरोधात उभे राहू. अमित शहा, मोदी, फडणवीस यांनी भिऊ नये. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी ही लढाई लढतील.’ अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याआधी NSUI आक्रमक; अध्यक्ष प्रद्युम्न यादव पोलिसांच्या ताब्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआयने विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी एनएसयूआय मुंबईचे अध्यक्ष प्रद्युम्न यादव यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याचा दावा संघटनेने केला आहे. दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रम: नव्या मुख्यालयाचे उद्घाटन: आज सकाळी 11 वाजता अमित शाह यांच्या हस्ते 'नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या नवनिर्मित मुख्यालयाचे अधिकृत उद्घाटन पार पडणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी हे कार्यालय उभारण्यात आले. शेअर बाजारात कार्यक्रम: मुंबई शेअर बाजारातील (BSE) इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांत ते बँकिंग, सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधतील. शुक्रवारी रात्रीच झाले आगमन अमित शाह शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. पुणे दौऱ्याची पार्श्वभूमी यापूर्वी अमित शाह यांनी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सन्मानित करण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या दौऱ्याला विरोध करत आंदोलने केली होती. पुणे दौऱ्यात शाह यांनी राजकीय भाष्य टाळले होते, मात्र आता मुंबई दौऱ्यात ते नेमके काय बोलतात आणि भाजप नेत्यांना कोणता कानमंत्र देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा