Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

डीजेविरोधात लढा देणारे विद्यानंद बापट निवडणूक लढवणार

आगामी पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. महायुतीसह सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीत आता एका नव्या आणि सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या चेहऱ्याची एन्ट्री होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या (DJ) आवाजाविरोधात एकाकी लढा देणारे विद्यानंद बापट निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असून याला कारण ठरली आहे ती प्रसिद्ध वकील ॲड. असीम सरोदे यांची एक सोशल मीडिया पोस्ट. असीम सरोदेंची पोस्ट आणि बापटांचे कौतुक ॲड. असीम सरोदे यांनी 'एक्स'वर विद्यानंद बापट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या उमेदवारीबाबत एक सूचक प्रश्न विचारला आहे.

डीजेविरोधात लढा देणारे विद्यानंद बापट निवडणूक लढवणार

Adv Aseem Sarode Post Sparks Debate; Will Vidyanand Bapat Contest Election? आगामी पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. महायुतीसह सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीत आता एका नव्य पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या (DJ) आवाजाविरोधात एकाकी लढा देणारे विद्यानंद बापट निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असून याला कारण ठरली आहे ती प्रसिद्ध वकील ॲड. असीम सरोदे यांची एक सोशल मीडिया पोस्ट. असीम सरोदेंची पोस्ट आणि बापटांचे कौतुक ॲड. असीम सरोदे यांनी 'एक्स'वर विद्यानंद बापट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या उमेदवारीबाबत एक सूचक प्रश्न विचारला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये बापटांचे तोंडभरून कौतुक केले आहे. सरोदे लिहितात, "ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसाविरोधात निर्भयपणे उभा राहिलेला विद्यानंद बापट आता सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. उत्सवांचे विकृत स्वरूप चव्हाट्यावर आणणारा तो एक हिरो ठरला आहे. अत्यंत विद्याविभूषित, सुसंस्कृत, विनम्र आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेला बापट आज जणू प्रत्येक घरातील सदस्य वाटू लागला आहे."

पुढे ते म्हणतात, "भाषेचा दर्जा न घसरवता मुद्देसूद बोलणाऱ्या आणि समाजाला व्यापक विचार देण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापट यांनी पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का?" सरोदे यांच्या याच प्रश्नामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात बापटांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. डीजेविरोधातील लढा आणि बापटांची ओळख पुण्यातील गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लावण्यात येणाऱ्या डीजेच्या भिंती आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाविरोधात विद्यानंद बापट यांनी थेट रस्त्यावर उतरून विरोध दर्शवला होता. या धाडसामुळे त्यांच्यावर हल्लाही झाला. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ध्वनिप्रदूषणाबाबत एक मोठी जागरूकता निर्माण झाली. विशेषतः या संपूर्ण घटनाक्रमात त्यांचे अस्खलित आणि अत्यंत संयत मराठी भाषेवरील प्रभुत्व सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले. लाऊडस्पीकरबाबत बापटांची ठाम भूमिका ध्वनिप्रदूषण आणि लाऊडस्पीकरबाबत विद्यानंद बापट यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यांच्यामते, खुल्या आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यावर पूर्णपणे बंदी असली पाहिजे. ही समस्या मुळापासून सोडवण्याची गरज आहे.

एकदा का खुल्या वातावरणात लाऊडस्पीकरला परवानगी दिली की, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. सणांच्या काळात या नियमांची अंमलबजावणी शिथिल होते. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई करणे आणि आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत बापट यांनी मांडले आहे. आता ॲड. सरोदे यांच्या या आवाहनानंतर आणि मिळालेल्या लोकप्रियतेनंतर विद्यानंद बापट खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्याला पुन्हा झोडपणार!: परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तो अधिक रौद्ररूप धारण करण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा