'उमेदवारीबाबत गोडसेंनी लवकरच गोड बातमी द्यावी', मंत्री छगन भुजबळ असं का म्हणाले?

Nashik News: मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये समता परिषदेच्या बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Apr 23, 2024 - 17:08
 0
'उमेदवारीबाबत गोडसेंनी लवकरच गोड बातमी द्यावी', मंत्री छगन भुजबळ असं का म्हणाले?
शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणत्या पक्षाला सुटेल हा पेच असताना आता शिंदेंच्या शिवसेनेला नाशिक लोकसभेची जागा देण्याची निश्चिती झाली आहे. मात्र विद्यमान खासदार गोडसे आणि प्रमुख पदाधिकारी यांची काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होईल असे जवळपास निश्चित झाले आहे. या संदर्भात छगन भुजबळ यांनी ''गोडसेंनी लवकरच गोड बातमी द्यावी'' असं बोलत या बैठकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये समता परिषदेच्या बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न करण्याचा निर्णय छगन भुजबळ यांनी घेतल्यानंतर समता परिषद आणि भुजबळ समर्थकांनी मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी अशी मागणी केली. मात्र काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री तीन वाजता बैठक घेत नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा करून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करून महायुतीचा उमेदवार दोन दिवसात निवडणुकीच्या रिंगणात असेल असे सांगितले. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभेची जागा मिळणार असे समजताच ''गोडसे यांनी लवकरच गोड बातमी द्यावी'', असे भुजबळ यांनी म्हटले. त्यामुळे आता महायुतीने लवकरात लवकर उमेदवारी घोषित करावा आणि प्रचाराला सुरुवात करावी असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना विरोध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला मात्र राज्यातील अनेक जागांवर चर्चा होऊन निर्णय घेतले गेले. मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही अद्याप जाहीर होऊ शकली नाही. सर्वच महायुतीतील घटक पक्षांनी नाशिकमध्ये दावा केल्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिक जोर लावल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे आता अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात शिंदेंच्या शिवसेनेने एकमत केल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभेची जागाही शिवसेनेची असून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दोन दिवसात जाहीर केले जाईल अशी माहिती दिली असल्याचं सांगितले. शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन दिवसात विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार यावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन गोडसेंनी लवकरच गोड बातमी द्यावी असे म्हणत गोडसेंना उमेदवारी मिळणार असल्यामुळे मंत्री छगन भुजबळ देखील गोडसेंच्या नावाने सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow