भाजपनं खातं उघडलं, उमेदवार बिनविरोध; पराभूत काँग्रेस नेता एकाएकी 'बेपत्ता', लवकरच मोठा गेम?

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. पण त्याआधीच भाजपनं खातं उघडलं आहे. गुजरातमधील सूरत लोकसभेची जागा भाजपनं बिनविरोध जिंकली आहे. त्यामुळे पहिलं कमळ गुजरातमध्ये फुललं आहे.

Apr 23, 2024 - 17:08
 0
भाजपनं खातं उघडलं, उमेदवार बिनविरोध; पराभूत काँग्रेस नेता एकाएकी 'बेपत्ता', लवकरच मोठा गेम?
गांधीनगर: काँग्रेस उमेदवार यांचा उमेदवारी बाद ठरवण्यात आल्यानंतर सूरत लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व अपक्ष उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना भाजपनं खातं उघडलं आहे. भाजपसाठी पहिलं कमळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये फुललं आहे.निवडणूक अर्ज बाद झाल्यानं मतदानापूर्वीच पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी आता एकाएकी बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले. पण त्यात यश आलेलं नाही. कुंभानी नॉट रिचेबल झाले आहेत. कुंभानी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यांच्या हाती असलेल्या फलकांवर 'जनता का गद्दार' असा उल्लेख आहे. भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध जिंकल्यानं निलेश कुंभाणी चर्चेत आले. कुंभाणी यांच्या प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये घोळ असल्यानं त्यांचा अर्ज बाद झाला. सूरत लोकसभेत भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी होताच काँग्रेसनं निवडणूक आयोगात धाव घेतली. सत्ताधाऱ्यांनी दबावाचा वापर दलाल यांना विजयी घोषित केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मतदारसंघात पुन्हा निवडणूक व्हावी अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. सूरतच्या जागेवर भाजपनं मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. प्रकरण काय?सूरत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून मुकेश दलाल, काँग्रेसकडून निलेश कुंभानी यांनी अर्ज दाखल केले होते. कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रिटर्निंग अधिकऱ्यानं एक दिवस आधीच रद्द केला. त्यांच्या प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर उर्वरित ८ उमेदवारांनीही त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. निवडणूक आयोगानं त्यांना विजयाचं प्रमाणपत्रदेखील दिलं. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow