Tukaram Mundhe FDA Warning; Influencers & Gyms Face Heavy Fines
तरुणाई आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स, प्रोटीन पावडर आणि वजन घटवणाऱ्या उत्पादनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता कंबर कसली आहे. "यापुढे कोणतीही जिम, फिटनेस सेंटर, हेल्थ क्लब किंवा औषधालय अन
हेल्थ सप्लिमेंट्स आणि जिम चालकांसाठी कडक नियमावली
बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत प्रोटीन पावडर, मल्टीव्हिटॅमिन गोळ्या, हर्बल कॅप्सूल आणि क्रीडापूरक आहाराची मागणी झपाट्याने वाढली असून, त्याचा तरुण पिढीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे मुंढे यांनी नमूद केले.
प्रत्येक विक्रेत्याला परवाना बंधनकारक
उत्पादक, ब्रँड मालक, आयातदार, वितरक, गोदामे, फार्मसी, रुग्णालये, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि जिम्स यांना हे नवे आदेश लागू आहेत. जिम ट्रेनर किंवा फिटनेस सेंटरकडून परवान्याशिवाय सप्लिमेंट्स विकणे किंवा सुचवणे हा गुन्हा ठरणार आहे.
हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असतात, ते कोणताही आजार किंवा न्यूनता बरी करू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक उत्पादनाच्या लेबलवर मोठ्या अक्षरात प्रवर्गाचे नाव, 'औषधी वापरासाठी नाही' (Not for medicinal use), शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त सेवन करू नये आणि 'मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा' असे इशारे छापणे बंधनकारक आहे.
अश्वगंधा व स्टेरॉइड्सवर करडी नजर
वनस्पतीजन्य घटकांमध्ये वनस्पतीचा नेमका कोणता भाग वापरला आहे हे नमूद करणे आवश्यक असून, अश्वगंधाच्या बाबतीत केवळ मुळांचाच वापर करण्यास परवानगी आहे. तसेच, उत्पादनाच्या नावात 'ओआरएस' (ORS) हा शब्द वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. क्रीडा पोषण, वजन घटवणारी आणि लैंगिक स्वास्थ्य उत्पादनांमध्ये छुप्या पद्धतीने स्टेरॉइड्स व औषधी द्रव्ये मिसळली जातात का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे.
13 नोव्हेंबरच्या धडक कारवाईत 1.38 कोटींचा माल जप्त
राज्यात या क्षेत्रात 313 उत्पादक, 759 रिलेबलर आणि 28 रिपॅकर कार्यरत आहेत. एफडीएने 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील 6 विभागांत (पुणे 5, नाशिक 5, कोकण 1, नागपूर 4, छत्रपती संभाजीनगर 1 आणि अमरावती 1) अशा एकूण 17 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून 1.38 कोटी रुपयांचा संशयित साठा जप्त केला आहे.
नियम मोडल्यास 10 लाखांचा दंड ते जन्मठेपेची शिक्षा!
अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि औषध व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (DMR Act) खालीलप्रमाणे कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती (इन्फ्लुएन्सर्ससह) आणि विनापरवाना व्यवसायासाठी: 10 लाख रुपये दंड
निकृष्ट दर्जाचे अन्न (कलम 51) आणि आरोग्यास अपायकारक उत्पादनासाठी: 5 लाख रुपये दंड
'औषधी वापरासाठी नाही' असे लेबल नसल्यास (मिसब्रँडेड): 3 लाख रुपये दंड
भेसळयुक्त पदार्थ बनवणे किंवा अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे उल्लंघन करणे: 2 लाख रुपये दंड
अस्वच्छ वातावरणात उत्पादन किंवा बाह्य पदार्थ आढळल्यास: 1 लाख रुपये दंड
निकृष्ट किंवा विषारी अन्नामुळे ग्राहकाचा मृत्यू झाल्यास (कलम 59): जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद
1 एप्रिल ते 31 ऑक्टोबरदरम्यान एफडीएचा महासपाटा; 170.38 कोटींचा साठा जप्त, 1707 जणांना अटक
नागरिकांना सुरक्षित अन्न व औषधे मिळावीत यासाठी एफडीएने 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर या कालावधीत केलेल्या राज्यव्यापी कारवायांची आकडेवारी आयुक्तांनी जाहीर केली.
एकूण तपासण्या व नोटिसा: राज्यात एकूण 33464 तपासण्या करण्यात आल्या (अन्न विभाग 25514 आणि औषध विभाग 7950). यामध्ये 14394 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या (अन्न 11506, औषध 2888).
परवाने निलंबित व रद्द: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3725 आस्थापनांचे परवाने निलंबित (अन्न 1651, औषध 2074), तर 578 आस्थापनांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले (अन्न 23, औषध 555).
170.38 कोटींची जप्ती आणि 169 गुन्हे: या मोहिमेत एकूण 170.38 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून यात अन्न विभागाचे 152.65 कोटी रुपये आणि औषध विभागाचे 17.73 कोटी रुपये समाविष्ट आहेत. राज्यभरात एकूण 169 एफआयआर (अन्न 132, औषध 37) दाखल करून 1707 आरोपींना (अन्न 1688, औषध 19) अटक करण्यात आली आहे.
प्रमुख खाद्यपदार्थांवरील कारवाई:
दूध: 1504 तपासण्यांत 2.04 लाख लिटरपेक्षा अधिक (94 लाख रुपये किमतीचे) दूध जप्त; 12 गुन्हे व 56 अटक.
दुग्धजन्य पदार्थ (खवा, पनीर, मिठाई): 2014 तपासण्यांत 3090 क्विंटल (12.43 कोटी रुपये किमतीचा) साठा जप्त; 6 गुन्हे व 3 अटक.
खाद्यतेल: 1268 तपासण्यांत 78675 क्विंटल (27.60 कोटी रुपये किमतीचे) तेल जप्त.
मसाले: 958 तपासण्यांत 2065 क्विंटल (22 कोटी रुपये किमतीचे) मसाले जप्त.
हॉटेल्स व रेस्टॉरंट्स: 6988 तपासण्यांत 4442 नोटिसा, 937 परवाने निलंबित (754 जागेवरच निलंबन) आणि 23 परवाने रद्द.
एफडीएच्या कारवाईमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा
कृत्रिम दूध, बनावट पनीर (ॲनालॉग पनीर) आणि भेसळयुक्त खव्यावर एफडीएने कठोर कारवाई केल्यामुळे शुद्ध दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मुंढे यांनी सांगितले. याचा थेट फायदा ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून, पूर्वी शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 30 ते 33 रुपये दर मिळत होता, तो आता 45 ते 47 रुपयांवर (तर खुल्या बाजारात 60 रुपयांपर्यंत) पोहोचला आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणही आता दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत.
दरम्यान, एफडीएच्या टोल-फ्री क्रमांकावर आणि 'complains.mahafda.in' या पोर्टलवर आतापर्यंत 19000 हून अधिक तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या आहेत. "नागरिकांना माझे आवाहन आहे की, कोणत्याही दबावाला किंवा भुलथापांना बळी पडू नका. कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी लेबल तपासा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कुठेही गैरप्रकार आढळल्यास थेट एफडीएकडे तक्रार करा, आम्ही तात्काळ कारवाई करू," असे आश्वासन तुकाराम मुंढे यांनी दिले.
---------------------------------------------------------------------------
मुंबईत उद्यानात जोडप्याला अल्पवयीन टोळक्याची मारहाण: बेल्ट, काठ्या अन् दगडांनी हल्ला; 8 मुलांवर गुन्हा दाखल, पालकांनाही नोटीस
मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या उद्यानात एका तरुण जोडप्याला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बेल्ट, काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण केली. या अमानुष हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तातडीने पावले उचलत ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अॅपवर