Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

जात पंचायतीकडून 20 लाख दंड; कुटुंबावरही बहिष्कार

सुनेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात न घेतल्यावरून जात पंचायतीने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरेपर्यंत स्वतःसह कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याची तक्रार महुद बु. येथील बाळू रामा माने (52) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच मांत्रिकाकडून जादूटोणा करून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी वामन कोंडीबा माने, सिताराम चिन्नाप्पा निंबाळकर, विजय नारायण निंबाळकर, बाळू भीमराव चव्हाण, दुर्गाप्पा भीमराव चव्हाण, सुखदेव शंकर निंबाळकर तसेच स्वप्निल आव्हाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृत शारदा 2020 पासून आजारी शारदा ही 2020 पासून आजारी होती. तिच्या माहेरच्या व्यक्तींचा मांत्रिक स्वप्निल आव्हाडे याच्यावर विश्वास असल्याने शारदाला धार्मिक विधीसाठी त्यांच्याकडे नेले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये शारदाचा आजाराने मृत्यू झाला. शारदाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ आली असता, स्वतःची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तसेच मुलगा ऊसतोडीसाठी बाहेर गेल्याने आपण मृतदेह ताब्यात घेतला नाही, असे माने यांनी म्हटले.

जात पंचायतीकडून 20 लाख दंड; कुटुंबावरही बहिष्कार

Caste Panchayat Fines Rs 20 Lakh; Family Boycotted, Reason Given For Not Taking Custody Of Daughter in law's Body In Sangola सुनेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात न घेतल्यावरून जात पंचायतीने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरेपर्यंत स्वतःसह कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याची तक्रार महुद बु. येथील बाळू रामा माने (52) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली आ तसेच मांत्रिकाकडून जादूटोणा करून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

याप्रकरणी वामन कोंडीबा माने, सिताराम चिन्नाप्पा निंबाळकर, विजय नारायण निंबाळकर, बाळू भीमराव चव्हाण, दुर्गाप्पा भीमराव चव्हाण, सुखदेव शंकर निंबाळकर तसेच स्वप्निल आव्हाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शारदा ही 2020 पासून आजारी होती. तिच्या माहेरच्या व्यक्तींचा मांत्रिक स्वप्निल आव्हाडे याच्यावर विश्वास असल्याने शारदाला धार्मिक विधीसाठी त्यांच्याकडे नेले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये शारदाचा आजाराने मृत्यू झाला. शारदाच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ आली असता, स्वतःची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तसेच मुलगा ऊसतोडीसाठी बाहेर गेल्याने आपण मृतदेह ताब्यात घेतला नाही, असे माने यांनी म्हटले.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा