Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

पार्थ पवारांना मुंढवा जमीन घोटाळ्यात आरोपी का केले नाही?-उच्च न्यायालय:डीजीपींसह तपास अधिकाऱ्यांना नोटीस, पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला होणार

पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा सदस्य पार्थ पवारांच्या भूमिकेबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य पोलिसांना धारेवर धरले. संबंधित कंपनीत भागीदार असतानाही पवार यांना या प्रकरणात अद्याप आरोपी का केले नाही, असा रोखठोक सवाल उपस्थित केला. याप्रकरणी पोलिस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे. एकाला आरोपी केले, मग दुसऱ्याला सूट का? : हायकोर्टाची पोलिसांना विचारणा संबंधित कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांना आरोपी केले असताना त्याच कंपनीचे भागीदार पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?” अशी थेट विचारणा न्यायालयाने केली. तसेच पार्थ पवार यांच्या या संपूर्ण व्यवहारातील भूमिकेबाबत पोलिसांचे नेमके काय म्हणणे आहे याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश कोर्टाने तपास यंत्रणेला दिले.

पार्थ पवारांना मुंढवा जमीन घोटाळ्यात आरोपी का केले नाही?-उच्च न्यायालय:डीजीपींसह तपास अधिकाऱ्यांना नोटीस, पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला होणार

Why Wasn't Parth Pawar Made An Accused In The Mundhwa Land Scam? High Court Issues Notice To Investigating Officers Including DGP, Next Hearing To Be Held On September 28 पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा सदस्य पार्थ पवारांच्या भूमिकेबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य पोलिसांना धारेवर धरले. संबंधित कंपनीत भागीदार असतानाही पवार यांना या प्रकरणात अद्याप आरोपी का केले याप्रकरणी पोलिस महासंचालक आणि तपास अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देत न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.

एकाला आरोपी केले, मग दुसऱ्याला सूट का? : हायकोर्टाची पोलिसांना विचारणा संबंधित कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांना आरोपी केले असताना त्याच कंपनीचे भागीदार पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?” अशी थेट विचारणा न्यायालयाने केली. तसेच पार्थ पवार यांच्या या संपूर्ण व्यवहारातील भूमिकेबाबत पोलिसांचे नेमके काय म्हणणे आहे याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश कोर्टाने तपास यंत्रणेला दिले. 28 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत राज्य पोलिस आणि तपास अधिकारी न्यायालयात काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा