MPSC Group C Combined Preliminary Exam Postponed, To Be Held On January 3, 2027 Instead Of October 25 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली असून, आता ती 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. पेपरफुटी आणि निकालांतील गोंधळाच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभू यामुळे उमेदवारांना तयारीसाठी अतिरिक्त वेळही मिळणार आहे.
पारदर्शकतेच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन करत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. संभाजीनगरातही दोन दिवसांपूर्वी निदर्शने करण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनात सहभाग घेत आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली.