This Year, Bailpola Is Celebrated In Pandharpur With Simplicity, Devotees Throng The Temple Committee's Cowshed To Worship And See The Enchanting Form Of Lord Vitthal अपुरा पाऊस, दुष्काळाचे सावट आणि साखर कारखान्यांनी ऊसाचा हप्ता न दिल्याचा थेट परिणाम यंदाच्या बैलपोळा सणावर दिसून आला आहे. गुरुवारी पंढरपूर तालुक्यात बैलपोळा सण अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान, गोकुळ अष्टमी व बैलपोळा उत्सवानिमित्त श्री विठ् श्रावण अमावस्येच्या दिवशी शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो, तसेच बैल, गाई व म्हशींना सजवून मिरवणूक काढत असतो. परंतु, यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील एकाही साखर कारखान्याने बैलपोळ्याचा हप्ता दिलेला नसल्याने शेतकऱ्यांना तीव्र आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले.
याचा परिणाम म्हणून नेहमी डीजे, हलगी, ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुका यंदा रद्द झाल्या. बैलांना धुवून, साध्या स्वरूपात सजवून नैवेद्य दाखवत पुरणपोळी खाऊ घालून दावणीलाच बांधून ठेवण्यात आले. तालुक्यात एकाही गावातून मिरवणूक निघाल्याची माहिती मिळालेली नाही. गोकुळ अष्टमी व बैलपोळा उत्सवानिमित्त श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, मोत्याचा तुरा, नाम हिऱ्याचा, कौस्तुभ मणी, दंडपेट्यात जोड मोठा, हिऱ्याचे कंगनजोड, मोत्याची कंठी दोन पदरी, शिरपेच लहान, शिरपेच मोठा, मत्स्य जोड, लक्ष्मी हार, अष्टपैलू मण्याची कंठी तीन पदरी, तांदळी हार सात पदरी, एकदानी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी, तोडेजोड आदी पारंपरिक व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले होते. नगराध्यक्ष प्रणिता भालके गायींना पुरणपोळी खाऊ घालण्यात आले.