Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

कडाक्याच्या भांडणानंतर भाजप नगरसेवकांचा सभात्याग

प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाबाबत ठराव मांडला जाणार होता. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र बचाव समितीने आयोजित केलेल्या महामोर्चात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला. पंढरपूर नगरपालिका सर्वसाधारण सभेत विठ्ठल मंदिर परिसर संकुल विकास आराखड्यास भू-संपादनाचा विषय होता. या विषयास विरोध करण्यासाठी कॉरिडॉरबाधित नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. संत नामदेव महाराज समाधी पासून निघालेला हा मोर्चा चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगरपालिकेवर येऊन धडकला. या वेळी मोठ्या संख्येने महिला, युवक आणि बाधित कुटुंबातील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी |पंढरपूर पंढरपूर नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक अर्थाने गाजली. विषयपत्रिकेत नसलेल्या गोशाळेच्या जागेवरून भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह वेठीस धरले, प्रचंड गदारोळ करीत सभात्याग केला. 15 मिनिटांनी पुन्हा सभागृहात येत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांसह एका सुरात पंढरपूर कॉरिडॉरचा विषय स्थगित ठेवला.

कडाक्याच्या भांडणानंतर भाजप नगरसेवकांचा सभात्याग

After A Heated Argument, BJP Corporators Walked Out Of The Meeting And Then, Together With The Opposition, Suspended The Corridor. पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाबाबत ठराव मांडला जाणार होता. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र बचाव समितीने आयोजित केलेल्या महामोर्चात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला. पंढरपूर नगरपालिका सर्वसाधारण सभेत विठ्ठल मंदिर परिसर संकुल विकास आराखड्यास भू-संपादनाचा विषय होता. या विषयास विरोध करण्यासाठी कॉरिडॉरबाधित नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. संत नामदेव महाराज समाधी पासून निघालेला हा मोर्चा चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगरपालिकेवर येऊन धडकला. या वेळी मोठ्या संख्येने महिला, युवक आणि बाधित कुटुंबातील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी |पंढरपूर पंढरपूर नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक अर्थाने गाजली. विषयपत्रिकेत नसलेल्या गोशाळेच्या जागेवरून भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह वेठीस धरले, प्रचंड गदारोळ करीत सभात्याग केला.

15 मिनिटांनी पुन्हा सभागृहात येत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांसह एका सुरात पंढरपूर कॉरिडॉरचा विषय स्थगित ठेवला. पंढरपूर नगरपालिकेच्या बुधवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेतील कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचा विषय होता. त्यामुळे सभागृहात याचे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. त्यातच सकाळी 10 वाजता कॉरिडॉर बाधित शेकडो बाधितांचा मोर्चा पालिकेच्या प्रवेशद्वारात येऊन बसला होता. नंतर मोर्चा थेट दुसऱ्या मजल्यावरी नगराध्यक्षांच्या कक्षासमोर येऊन ठिय्या मारून बसला होता. . सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्तावर दीड तास खल केल्यानंतर बुधवारच्या विषयपत्रिकेवर कामकाज सुरू झाले. भाजप नगरसेवकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महसूल विभागाने दिलेल्या यमाई तलावालगतच्या गोशाळेच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला. आणि ती जागा देण्यास विरोध करण्याचा ठराव करावा, अशी मागणी केली.

परंतु ती जागा पंढरपूर नगरपालिकेची नाही तर शासनाची आहे, त्यामुळे असा ठराव करता येणार नाही, अशी भूमिका नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यासह तीर्थक्षेत्र आघाडीच्या नगरसेवकांनी घेतली. हा ठराव केल्यास सर्व विषयांना मंजूरी देऊ, अशी तडजोडीची भूमिका भाजप नगरसेवकांनी घेतली. मात्र त्यासमोर तीर्थक्षेत्रने तडजोड केली नाही, नगराध्यक्ष भालके यांनीही असा ठराव होणार नाही असे स्पष्ट केले. भाजप नगरसेवक बाहेर गेले. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 12 आणि एक अपक्ष असे 13 नगरसेवक सभागृहात राहिले होते. अशा परिस्थितीत सभा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय तीर्थक्षेत्रच्या नगरसेवकांनी घेतला. अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी यांनी सुरवातीलाच या विषयाला नागरिकांचे नुकसान करणाऱ्या या कॉरिडॉरला विरोध केला. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक संजय बंदपट्टे, राहुल शिंदे नाईक यांनी शासनाने पालिका आणि सर्व नगरसेवकांना, बाधित नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही, त्यामुळे हा विषय स्थगित करण्याची सूचना केली. तर उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, भाजपचे पक्षनेते भागवत बडवे, नगरसेवक लक्ष्मण शिरसाट यांनी या विषयावर शासनाने नागरिकांना विश्वासात घ्यावे, त्यांचे पुनर्वसन, सविस्तर कॉरिडॉर आराखडा यावर सभागृहाला आणि बाधित नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी करत हा विषय स्थगित ठेवण्याची सूचना केली. दोन्ही आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी एक सुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखडा या विषयाला स्थगिती दिली.

यानंतर सर्व विषयवार चर्चा होऊन सुमारे 5 तासानंतर सभेचे कामकाज संपले. त्यानंतर नगराध्यक्षा डॉ. प्रणिती भालके, माजी मुख्याधिकारी महेश रोकडे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, श्री. नागेश भोसले यांच्यासह बहुसंख्य नगरसेवकांनी आंदोलनस्थळी जाऊन बचाव समितीचे निवेदन स्वीकारले व योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. ^1982 सालच्या मास्टर प्लानचा वाईट अनुभव मंदिर परिसरातील नागरिकांना आलेला आहे, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे, त्याच बरोबर शासनाकडून नगराध्यक्ष आणि सर्व चाळीस नगरसेवकांना विश्वासात घेतलेले नाही, लेखी स्वरूपात काहीही दिलेले नाही,आराखडा कसा आहे, याची माहिती एकही सदस्याला नाही, त्यामुळे सभागृहाच्या मतानुसार हा विषय स्थगित ठेवण्यात येत आहे. डॉ. प्रणिता भालके, नगराध्यक्षा 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा