Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎

मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्यावर बस व ट्रकची समोरसमोर भीषण धडक झाली. बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात इर्शादबी रमजान मणियार (70, रा. जामनेर) व रखूबाई पिरन माळी (65, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक, बस चालक व वाहकासह 32 जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. तर बसच्या पुढील भाग चक्काचूर झाला. पिंपळगाव आगाराची नाशिक -पाचोरा बस (एम.एच. 40 वाय 5822) चाळीसगावच्या दिशेने जात होती. यावेळी समोरुन मालेगावच्या दिशेने जाणारा आयशर (एम. एच. 19 सीवाय 8525) व बसची समोरासमोर धडक झाली. परिसरातील नागरिक व अन्य वाहन चालकांनी मदत करत बसमधील जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे घटनास्थळी अपघातातील मृत रखूबाई पिरन माळी ह्या नाशिक येथे मुलाकडे राहत होत्या. मुळगावी एरंडोल येथे रेशनिंगच्या कामासाठी येत असताना ही घटना घडली. तर इर्शादबी मणियार यांचा बांगड्या विक्रीचा व्यवसाय होता. मालेगाव येथून येतांना हा अपघात झाला.

बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎

Bus truck Collision; Two Women Killed, 31 Injured, Accident On Chalisgaon Malegaon Road; Dead Woman From Erandol, Jamner; Bus Smashed मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्यावर बस व ट्रकची समोरसमोर भीषण धडक झाली. बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात इर्शादबी रमजान मणियार (70, रा. जामनेर) व रखूबाई पिरन माळी (65, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक, बस चालक व वाहकासह 32 जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. तर बसच्या पुढील भाग चक्काचूर झाला. पिंपळगाव आगाराची नाशिक -पाचोरा बस (एम.एच. 40 वाय 5822) चाळीसगावच्या दिशेने जात होती. यावेळी समोरुन मालेगावच्या दिशेने जाणारा आयशर (एम. एच. 19 सीवाय 8525) व बसची समोरासमोर धडक झाली.

परिसरातील नागरिक व अन्य वाहन चालकांनी मदत करत बसमधील जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे घटनास्थळी अपघातातील मृत रखूबाई पिरन माळी ह्या नाशिक येथे मुलाकडे राहत होत्या. मुळगावी एरंडोल येथे रेशनिंगच्या कामासाठी येत असताना ही घटना घडली. तर इर्शादबी मणियार यांचा बांगड्या विक्रीचा व्यवसाय होता. मालेगाव येथून येतांना हा अपघात झाला. रेशनिंगच्या कामासाठी गावी येताना अपघात अपघातातील जखमींची नावे : गोकूळ रामदास भामरे (60), सुनंदा गोकूळ भामरे (52), शरयू शुभम सोनजे (3), ऋतूजा शुभम सोनजे (28), राजेंद्र जगन्नाथ ततार (60), आशा राजेंद्र ततार (55), परिणिता विनोद ततार (28), रत्नाबाई नाना अहिरे (53), शबाना शाह (45), निदा शाह (19), छाया इंद्रजित भामरे (48), अलका जाधव (47), सुनिता मालजी मोरे (45), योगेश चोरमोळे (41), सविता दीपक मोरे (40), जनार्दन किसन घूमरे (45), माया संतोष मोरे (50), सुनीता नानाजी मोरे (40) आदी जखमी झाले आहेत.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा