Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

मुंबईत छेडछाडीचा जाब विचारताच तरुणीला लोकलमधून ढकलले:चाकाखाली आल्याने तरुणीचा डावा हात निकामी, आरोपीस अटक

लोकलमधील गर्दीमुळे चुकून दिव्यांग डब्यात चढलेल्या 20 वर्षीय विवाहित तरुणीची छेड काढून तिला धावत्या रेल्वे रुळांवर ढकलून दिल्याची संतापजनक घटना पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात घडली आहे. फलाटावर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाल्याने तरुणीचा डावा हात चाकाखाली सापडला. कूपर रुग्णालयातील डॉक्टरांना तिचा डावा हात कोपराखालून कापावा लागला आहे. या प्रकरणी भाईंदर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जितेंद्र हिरमुखे (53, रा. वाकीपाडा, नायगाव पूर्व) याला अटक केली असून, त्याला कर्करोगाचा आजार असल्याचे समोर आले आहे. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तरुणी बोरिवलीहून विरार लोकलने नायगावला घरी परतत होती. गाडीला प्रचंड गर्दी असल्याने ती दिव्यांगांसाठी राखीव डब्यात चढली. प्रवासादरम्यान आरोपी जितेंद्रने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. लोकल नायगाव स्थानकात थांबल्यानंतर तरुणीने त्याला जाब विचारत चप्पल मारली. यातून संतापलेल्या आरोपीने तिला दोन्ही हातांनी जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या फटीतून थेट रुळांवर कोसळली.

मुंबईत छेडछाडीचा जाब विचारताच तरुणीला लोकलमधून ढकलले:चाकाखाली आल्याने तरुणीचा डावा हात निकामी, आरोपीस अटक

लोकलमधील गर्दीमुळे चुकून दिव्यांग डब्यात चढलेल्या 20 वर्षीय विवाहित तरुणीची छेड काढून तिला धावत्या रेल्वे रुळांवर ढकलून दिल्याची संतापजनक घटना पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात घडली आहे. फलाटावर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाल्याने तरुणीचा डावा हात चाकाखाली सापडला. कूपर रुग्णालयातील डॉक्टरांना तिचा डावा हात कोपराखालून कापावा लागला आहे. या प्रकरणी भाईंदर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जितेंद्र हिरमुखे (53, रा. वाकीपाडा, नायगाव पूर्व) याला अटक केली असून, त्याला कर्करोगाचा आजार असल्याचे समोर आले आहे.

4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तरुणी बोरिवलीहून विरार लोकलने नायगावला घरी परतत होती. गाडीला प्रचंड गर्दी असल्याने ती दिव्यांगांसाठी राखीव डब्यात चढली. प्रवासादरम्यान आरोपी जितेंद्रने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. लोकल नायगाव स्थानकात थांबल्यानंतर तरुणीने त्याला जाब विचारत चप्पल मारली. यातून संतापलेल्या आरोपीने तिला दोन्ही हातांनी जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या फटीतून थेट रुळांवर कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागून 16 टाके पडले आहेत, तर डावा हात कायमचा गमवावा लागला आहे. घटनेनंतर चेहऱ्यावर रुमाल बांधून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी तांत्रिक तपासातून बेड्या ठोकल्या.

गुन्हा नोंदवण्यास 2 दिवसांचा विलंब, पोलिसांची सौम्य भूमिका 4 नोव्हेंबरला ही गंभीर घटना घडूनही भाईंदर रेल्वे पोलिसांनी 6 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. सुरुवातीला हत्येच्या प्रयत्नाचे कलम (बीएनएस 109) वगळून केवळ विनयभंग व दुखापतीचे (कलम 74, 117(2) आणि 352) सौम्य गुन्हे नोंदवल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. अखेर मनसे विधानसभा प्रमुख सचिन पोपळे आणि नातेवाइकांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत तुंबडा यांची भेट घेऊन आक्रमक पवित्रा घेतला.

एका हाताने मी आता काय करू? माझे आयुष्यच उद्ध्वस्त झाले मी बोरिवलीहून नायगावला जाण्यासाठी लोकल पकडली होती. स्टेशन जवळ येताच आरोपी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला. खाली उतरल्यावर मी जाब विचारून चप्पल मारली, तर त्याने मला खाली ढकलून दिले. मी घरातली एकटीच कमावती होते. एक हात निकामी झाला. डोक्याला 16 टाके पडले. आयुष्य उद्ध्वस्त झाले.

मला न्याय हवा . - पीडित तरुणी

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा