Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

देशातील पहिली अँटी-नार्कोटिक्स व्हॅन ते एआय 'तपास सारथी':मुंबई पोलिसांच्या हायटेक सुविधांचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या नवीन तंत्रज्ञानयुक्त सुविधांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामध्ये अत्याधुनिक 'फ्युजन सेंटर' आणि देशातील पहिल्या 'अँटी-नार्कोटिक्स व्हॅन'चा समावेश आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीसिंगमध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्याचा सरकारचा मानस व्यक्त केला. तसेच, एफआयआरपासून चार्जशीटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एआयच्या (AI) मदतीने अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात 'तपास सारथी' प्रणाली तयार केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील पहिली 'अँटी-नार्कोटिक्स व्हॅन' आणि ब्लॉकचेनचा वापर अमली पदार्थांविरोधातील लढाईला गती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॅनचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले, आजकाल 30 ते 35 हजार लोकांच्या उपस्थितीत मोठे कार्यक्रम होतात. अशा ठिकाणी अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये जरब बसवण्यासाठी ही अँटी-नार्कोटिक्स व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरेल. ड्रग्स डीलर किंवा संबंधितांवर कारवाई करताना पंचनामा, कॅमेरा रेकॉर्डिंग आणि पुराव्यांचे संकलन या व्हॅनच्या माध्यमातूनच योग्य पद्धतीने होईल. व

देशातील पहिली अँटी-नार्कोटिक्स व्हॅन ते एआय 'तपास सारथी':मुंबई पोलिसांच्या हायटेक सुविधांचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या नवीन तंत्रज्ञानयुक्त सुविधांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामध्ये अत्याधुनिक 'फ्युजन सेंटर' आणि देशातील पहिल्या 'अँटी-नार्कोटिक्स व्हॅन'चा समावेश आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीसिंगमध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्याचा सरकारचा मानस व्यक्त केला. तसेच, एफआयआरपासून चार्जशीटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एआयच्या (AI) मदतीने अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात 'तपास सारथी' प्रणाली तयार केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील पहिली 'अँटी-नार्कोटिक्स व्हॅन' आणि ब्लॉकचेनचा वापर अमली पदार्थांविरोधातील लढाईला गती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॅनचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले, आजकाल ३० ते ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत मोठे कार्यक्रम होतात. अशा ठिकाणी अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये जरब बसवण्यासाठी ही अँटी-नार्कोटिक्स व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरेल. ड्रग्स डीलर किंवा संबंधितांवर कारवाई करताना पंचनामा, कॅमेरा रेकॉर्डिंग आणि पुराव्यांचे संकलन या व्हॅनच्या माध्यमातूनच योग्य पद्धतीने होईल. विशेष म्हणजे, गोळा केलेले पुरावे 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानात सुरक्षित साठवले जातील." 'नशामुक्त भारत' आणि 'नशामुक्त महाराष्ट्र' मोहिमेसाठी अशा व्हॅन्स राज्याच्या इतर भागांतही तयार केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. एआयच्या मदतीने 'तपास सारथी' प्रणाली गुन्ह्यांच्या तपासातील तांत्रिक त्रुटींमुळे आरोपी निर्दोष सुटू नयेत, यासाठी सरकार 'तपास सारथी' ही प्रणाली विकसित करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, "एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे. आता ६० ते ९० दिवसांत चार्जशीट दाखल करण्याचे देशभरात मॉनिटरिंग होते आणि त्यावर राज्याचे रँकिंग ठरते. हजारो पानांची चार्जशीट तयार करताना पुराव्यांची साखळी कशी असावी, यासाठी न्यायालयाचे जुने निर्णयही या प्रणालीत फीड केले जात आहेत." नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने 'हॅश व्हॅल्यू'च्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया 'एंड-टू-एंड डिजिटल' करण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई पोलिसांचा जागतिक दर्जा आणि सायबर सज्जता मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचा गौरव करताना फडणवीस म्हणाले की, "मुंबई पोलीस हे देशात नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिले असून, जागतिक स्तरावर त्यांची मोठी कीर्ती आहे. आता सीसीटीव्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, डेटा डिसायफरिंग, सोशल मीडिया आणि डार्क नेटचे विश्लेषण करून घडणारे तसेच घडू शकणारे गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस अधिक सज्ज झाले आहेत. ---------------- हेही वाचा.. परवान्याशिवाय प्रोटीन पावडर-सप्लिमेंट्स विकणाऱ्या जिम्सना टाळे ठोकणार: दिशाभूल करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना 10 लाखांचा दंड; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

तरुणाई आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स, प्रोटीन पावडर आणि वजन घटवणाऱ्या उत्पादनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता कंबर कसली आहे. "यापुढे कोणतीही जिम, फिटनेस सेंटर, हेल्थ क्लब किंवा औषधालय अन्न सुरक्षा परवान्याशिवाय (FSSAI) हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री किंवा शिफारस करू शकणार नाही. तसेच, 'मधुमेह, कॅन्सर बरा होतो किंवा झटपट वजन कमी होते' असे खोटे दावे करणाऱ्या कंपन्या आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर थेट कायदेशीर कारवाई करून 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल," असा सणसणीत इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भातील सर्वसमावेशक अनुपालन आदेश (कम्प्लायन्स ऑर्डर) जारी केल्याची माहिती देत, गेल्या 7 महिन्यांत राज्यात तब्बल 170.38 कोटी रुपयांचा भेसळयुक्त व अवैध साठा जप्त केल्याचा धक्कादायक लेखाजोखाच मांडला. सविस्तर वाचा

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा