Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

मनोज जरांगेंच्या सांगण्यावरूनच भ्याड हल्ला!:रेखा कोंडे यांचा खळबळजनक आरोप; मारणे गँगशी कनेक्शन आणि शरद मोहोळची बहीण म्हणत जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा रेखा कोंडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. या घटनेनंतर शनिवारी (21 नोव्हेंबर 2026) रेखा कोंडे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि हल्लेखोर महिलांवर गंभीर आरोप केले आहेत. "मनोज जरांगे यांना 500 कोटींच्या क्लिपच्या एसआयटी चौकशीबाबत प्रश्न विचारल्याचा राग धरूनच त्यांच्या समर्थक महिलांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, निमंत्रण नसताना कार्यक्रमात घुसून 'माझे मारणे गँगशी कनेक्शन आहे, मी शरद मोहोळची बहीण आहे, तुला संपवून टाकीन,' अशी धमकी देण्यात आली," असा खळबळजनक गौप्यस्फोट रेखा कोंडे यांनी केला आहे. टिळक रस्त्यावर शुक्रवारी रात्री नेमके काय घडले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या 'छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणोत्तर वाद : विवेकवादी भूमिका' या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवाद प्रकाशन सोहळ्या

मनोज जरांगेंच्या सांगण्यावरूनच भ्याड हल्ला!:रेखा कोंडे यांचा खळबळजनक आरोप; मारणे गँगशी कनेक्शन आणि शरद मोहोळची बहीण म्हणत जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा रेखा कोंडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. या घटनेनंतर शनिवारी (21 नोव्हेंबर 2026) रेखा कोंडे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि हल्लेखोर महिलांवर गंभीर आरोप केले आहेत. "मनोज जरांगे यांना 500 कोटींच्या क्लिपच्या एसआयटी चौकशीबाबत प्रश्न विचारल्याचा राग धरूनच त्यांच्या समर्थक महिलांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, निमंत्रण नसताना कार्यक्रमात घुसून 'माझे मारणे गँगशी कनेक्शन आहे, मी शरद मोहोळची बहीण आहे, तुला संपवून टाकीन,' अशी धमकी देण्यात आली," असा खळबळजनक गौप्यस्फोट रेखा कोंडे यांनी केला आहे. टिळक रस्त्यावर शुक्रवारी रात्री नेमके काय घडले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या 'छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणोत्तर वाद : विवेकवादी भूमिका' या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवाद प्रकाशन सोहळ्यासाठी रेखा कोंडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्या एकट्या व बेसावध असताना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्षा आरती मारणे-पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या 7 ते 8 महिलांनी आपल्यावर अचानक हल्ला चढवल्याचा आरोप कोंडे यांनी केला आहे. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 500 कोटींची डफली वाजवण्यापेक्षा सागर बंगला गाठा पत्रकार परिषदेत बोलताना रेखा कोंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा लढा गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे; मात्र कधीही मराठा विरुद्ध वंजारी, माळी किंवा धनगर असा वाद नव्हता. 2023 मध्ये मनोज जरांगे आल्यापासून राज्यात जातीवाद सुरू झाला. मी त्यांना थेट प्रश्न विचारत असल्याने गेल्या 2 महिन्यांपासून माझ्यावर चारित्र्यहनन, बदनामी आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. 500 कोटींच्या क्लिपवरून प्रश्न विचारल्याने संताप दोन दिवसांपूर्वी मी पोस्ट करून जरांगे यांना सुनावले होते की, 500 कोटींच्या क्लिपची डफली घेऊन गावभर फिरण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'सागर' बंगला गाठा आणि एसआयटी (SIT) चौकशीचे सत्य बाहेर आणा. या प्रश्नामुळेच संतापून जरांगे यांनी आता महिलांना पुढे करून माझ्यावर हल्ला घडवून आणला. यापूर्वी अजय बारसकर महाराज, अमोल खुणे आणि डॉ. तारक यांच्यावरही असेच हल्ले झाले आहेत. मी या भ्याड हल्ल्यांना घाबरणारी नसून, आता थेट मनोज जरांगे यांच्यावरच गुन्हा दाखल करणार आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याबाहेरही घोषणाबाजी गुन्हा दाखल करायला गेलो असता संबंधित महिलेने पोलीस ठाण्याखाली उभे राहून 'मनोज जरांगे यांना पुण्यात यावे लागेल आणि लांडगे मराठ्यांना धडा शिकवावा लागेल,' अशी आरडाओरड केली. याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असून जरांगे हेच या हल्ल्याचे सूत्रधार आहेत. सीडीआर व बँक खात्यांची चौकशी करा; फडणवीस, शिंदे व सुनेत्रा पवारांची भेट घेणार या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आपण पुणे पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देणार असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचे कोंडे यांनी सांगितले. हल्लेखोर महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या पुरुषांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तसेच बँक खात्यांची तपासणी केल्यास या हल्ल्यामागील खरा सूत्रधार समोर येईल. तसेच 'मारणे गँग' आणि 'शरद मोहोळ' यांचे नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपल्याला तात्काळ पोलीस संरक्षण मिळावे; केवळ 'लाडकी बहीण' म्हणून चालणार नाही, तर महिलांना प्रत्यक्ष सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली. दरम्यान, संगीता वानखेडे यांच्यासोबतच्या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता, त्या क्लिपची सत्यता तपासणार असल्याचे सांगत, आरती मारणे आणि त्यांच्या बहिणीनेच गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून माझ्या व माझ्या पतीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली होती, असा दावा कोंडे यांनी केला. माझे 4 लग्न झाल्याचा खोटा प्रचार केला, मला 2 मुली आहेत – आरती मारणे यांचा पलटवार दुसरीकडे, आरती मारणे-पवार यांनी रेखा कोंडे यांचे सर्व आरोप फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "रेखा कोंडे यांनी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओद्वारे माझी प्रचंड बदनामी केली आहे. माझे 4 लग्न झाले आहेत असा खोटा आणि घाणेरडा प्रचार त्या करत आहेत. मला 2 मुली आहेत, त्यांनी हे ऐकल्यावर त्यांना काय वाटेल? मी कधीही त्यांच्याबद्दल वाईट बोलले नव्हते, पण अन्याय सहन करणारी मी नाही, मी मराठ्यांची वाघीण आहे," असे मारणे यांनी म्हटले आहे. तसेच, रेखा कोंडे या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधातही सातत्याने बोलत असतात व पक्ष बदलत असतात; त्यामुळे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कोंडे यांची पक्षातून आणि मराठा महासंघातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही आरती मारणे यांनी केली आहे. ----------------------------------------------- हेही वाचा… मुंबईत उद्यानात जोडप्याला अल्पवयीन टोळक्याची मारहाण: बेल्ट, काठ्या अन् दगडांनी हल्ला; 8 मुलांवर गुन्हा दाखल, पालकांनाही नोटीस मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या उद्यानात एका तरुण जोडप्याला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बेल्ट, काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण केली. या अमानुष हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तातडीने पावले उचलत ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा