ईद-ए-मिलाद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित नगरसेवक चषक 2026 ही ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकूण 16 संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दि डोमिनेटर संघाने आय ॲण्ड टी पॉवर संघावर 28 धावांनी मात करत नगरसेवक चषक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेप्रसंगी सोलापूर जि. प. अध्यक्ष दिपक वैद्य, माजी नगरसेवक प्रशांत कथले यांनी आवर्जून उपस्थित दर्शवली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बांधकाम सभापती दीपक राऊत, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, सभापती हाजी इम्तियाज बागड, गटनेते विजय चव्हाण, गटनेते राजेंद्र घोंगाणे, बाळासाहेब तातेड, नगरसेवक अण्णा वाणी, नगरसेवक प्रकाश माने, शकिर जलसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाकीर जलसे, मुन्ना मोमीन, असिफ मुल्ला, जाविद जलसे, बिलाल शेख, रफिक हन्नूरे, रफिक मोमीन, महम्मद मोमीन, अकील महेंदवी, शोहेब मोमीन, मुबीन महेंदवी तसेच शाकीर भाई जलसे मित्र मंडळ, असिफ भाई मित्र मंडळ आणि डी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेते संघ व खेळाडू प्रथम क्रमांक (विजेता): दि डोमीनेटर - 30 हजार व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक (उपविजेता): आय अँड टी पॉवर - 15 हजार व ट्रॉफी, तृतीय क्रमांक: रूद्र टायटन्स- 7 हजार व ट्रॉफी वैयक्तिक पारितोषिके: मालिकावीर : संकल्प कांबळे ( 2 हजार व ट्रॉफी) उत्कृष्ट फलंदाज: अभी तेरकर ( 1 हजार व ट्रॉफी) उत्कृष्ट गोलंदाज : रमजान शेख (1 हजार व ट्रॉफी) अंतिम सामनावीर : सिद्धार्थ सोलवट (आकर्षक ट्रॉफी).