Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎

अकलूज महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित नागपंचमी महोत्सवात पैठणी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी कादंबरी सूर्यवंशीना पैठणी तर, उपविजेत्या पूजा शिंदेना सोन्याची नथ देण्यात आली. रिलमेकिंग स्पर्धेत वैशाली वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील धवल श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्त दोन दिवसीय महोत्सवात मुली व महिलांसाठी रांगोळी, मेंदी, पाककला, सौंदर्य प्रसाधन, निबंध, वक्तृत्व, रिलमेकिंग तसेच पैठणीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन तर पद्मजादेवी मोहिते-पाटील व रीलस्टार सारिका देवरुखकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अकलूजसारख्या ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कला सादर करून नाग पंचमीचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठ स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हा उपक्रम गेल्या 25 वर्षांपूर्वी सुरू केला. तो पुढे डॉ. धवलसिंह यांनी सुरू ठेवला आहे.

अकलूजच्या नागपंचमीत सूर्यवंशींना पैठणी, शिंदेंना नथ:जनसेवा संघटना आयोजित महोत्सवात मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; वैशाली वाघमारे रिलमेकिंगच्या मानकरी‎

अकलूज महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना आयोजित नागपंचमी महोत्सवात पैठणी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी कादंबरी सूर्यवंशीना पैठणी तर, उपविजेत्या पूजा शिंदेना सोन्याची नथ देण्यात आली. रिलमेकिंग स्पर्धेत वैशाली वाघमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील धवल श्रीराम मंदिरात नागपंचमीनिमित्त दोन दिवसीय महोत्सवात मुली व महिलांसाठी रांगोळी, मेंदी, पाककला, सौंदर्य प्रसाधन, निबंध, वक्तृत्व, रिलमेकिंग तसेच पैठणीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन तर पद्मजादेवी मोहिते-पाटील व रीलस्टार सारिका देवरुखकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अकलूजसारख्या ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कला सादर करून नाग पंचमीचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठ स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हा उपक्रम गेल्या 25 वर्षांपूर्वी सुरू केला.

तो पुढे डॉ. धवलसिंह यांनी सुरू ठेवला आहे. महिलांनी या सुरक्षित संधीचा लाभ घ्यावा, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विविध बक्षिसे ही ठेवली असून आता ज्यांना मिळाली नाहीत,त्यांनी पुढील वर्षीही सहभागी होऊन बक्षिसे मिळावीत, असे आवाहन पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण वर्षा माने, उमेश शिंदे, आरजे बंड्या, पूजा झांबरे, राम देवरुखकर व ज्योती कुंभार यांनी केले. शिवानी कांबळे, मिनाज शेख, गौरी भोसले विजेत्या पैठणी स्पर्धेत शेवटी 52 महिला उतरल्या होत्या. त्यातून वेगवेगळ्या स्पर्धेतून विजेता व उपविजेता निवडल्या. सांगलीचे आरजे बंड्या यांनी या स्पर्धेसाठी निवेदनाचे काम केले.

रीलमेकींगमध्ये शिवानी कांबळे द्वितीय, तर मिनाज शेख व गौरी भोसले यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. रांगोळी अन् मेंदी स्पर्धाही पार पडल्या उत्साहात रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे कादंबरी सूर्यवंशी, दिव्या आदलिंगे व राणी खरात, मेंदीमध्ये कोमल नाळे, दिव्या आदलिंगे व वनिता पवार, पाककलेत गौरी भोसले, शीतल ताम्हाणे व नसरीन बागवान तृतीय,मेकअप स्पर्धेत अफसाना मुलाणी, अमृता जगताप व स्वप्नाली घोगरे तृतीय, निबंध स्पर्धेत रुपाली पताळे, क्रांती कानडे, तर वैशाली सुळे व जयश्री गोडसे विभागून तृतीय, वक्तृत्व स्पर्धेत चैताली भंडारे, क्रांती कानडे व वनिता पवार तृतीय याप्रमाणे विजेत्या ठरल्या.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा