Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

त्रास झाल्यास भाजपच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा!:कर्जवसुलीसाठी घराला कुलूप ठोकणाऱ्या फायनान्स कंपन्यांना 'आमच्या स्टाइलने' उत्तर देऊ -परिणय फुके

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असताना, दुसरीकडे बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी सुरू असलेल्या अमानुष दादागिरीविरोधात भाजप नेते व आमदार परिणय फुके यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीची कर्जवसुली थांबवण्याचे स्पष्ट आदेश आणि आवाहन करूनही वसुलीचा तगादा सुरूच असल्याने फुके यांनी संबंधित संस्थांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य कर्जदारांना कोणाचाही त्रास झाल्यास आम्ही त्यांना आमच्या स्टाईलने उत्तर देऊ," असा सज्जड दम आमदार परिणय फुके यांनी भरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी गावात एका कर्जदार शेतकऱ्याचे घर फायनान्स कंपनीने कुलूपबंद केल्याच्या संतापजनक घटनेनंतर त्यांनी हा इशारा दिला आहे. तुमसरच्या वाहनी गावात नेमके काय घडले? दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आधीच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा असताना, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या वाहनी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. कर्ज थकल्याच्या कारणावरून एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यां

त्रास झाल्यास भाजपच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा!:कर्जवसुलीसाठी घराला कुलूप ठोकणाऱ्या फायनान्स कंपन्यांना 'आमच्या स्टाइलने' उत्तर देऊ -परिणय फुके

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असताना, दुसरीकडे बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी सुरू असलेल्या अमानुष दादागिरीविरोधात भाजप नेते व आमदार परिणय फुके यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीची कर्जवसुली थांबवण्याचे स्पष्ट आदेश आणि आवाहन करूनही वसुलीचा तगादा सुरूच असल्याने फुके यांनी संबंधित संस्थांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य कर्जदारांना कोणाचाही त्रास झाल्यास आम्ही त्यांना आमच्या स्टाईलने उत्तर देऊ," असा सज्जड दम आमदार परिणय फुके यांनी भरला आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वाहनी गावात एका कर्जदार शेतकऱ्याचे घर फायनान्स कंपनीने कुलूपबंद केल्याच्या संतापजनक घटनेनंतर त्यांनी हा इशारा दिला आहे. तुमसरच्या वाहनी गावात नेमके काय घडले? दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आधीच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा असताना, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या वाहनी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. कर्ज थकल्याच्या कारणावरून एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्याच्या घरातील संसारोपयोगी सामान बाहेर काढून घराला कुलूप ठोकले. या अमानुष कारवाईमुळे संबंधित शेतकऱ्याचे कुटुंब ऐन संकटात उघड्यावर आले होते. स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर घर केले मुक्त या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फायनान्स कंपनीच्या या बेकायदेशीर कारवाईला कडाडून विरोध केला. स्थानिक नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि हस्तक्षेपानंतर अखेर फायनान्स कंपनीने घराचे कुलूप उघडले आणि ते घर पुन्हा शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. दादागिरी मोडून काढणार; मदतीसाठी भाजपच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा या घटनेचा तीव्र निषेध करत आमदार परिणय फुके यांनी मायक्रो फायनान्स कंपन्या आणि बँकांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. ते म्हणाले की, दुष्काळाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकऱ्यांवर आणि गरीब कर्जदारांवर अशा प्रकारे दडपशाही करणे अत्यंत निंदनीय आहे. सरकारचे स्पष्ट निर्देश असतानाही जर या कंपन्या आपली दादागिरी थांबवणार नसतील, तर भाजप कार्यकर्ते त्यांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देतील. यासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकरी व कर्जदारांना दिलासा देण्यासाठी भाजपकडून विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याला किंवा कर्जदाराला बँका अथवा मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी त्रास, धमकी किंवा जप्तीची भीती दाखवली जात असल्यास त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. तत्काळ मदत मिळणार अशा पीडित कर्जदारांनी भाजपकडून जारी करण्यात आलेल्या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. तक्रार प्राप्त होताच भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते क्षणाचाही विलंब न लावता संबंधित कर्जदाराच्या मदतीला धावून जातील आणि फायनान्स कंपन्यांची ही दादागिरी कायमची बंद पाडतील, अशी ठाम ग्वाही परिणय फुके यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारने मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्याचे संकेत दिले असतानाही, ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरांना कुलूप लावण्यापर्यंत यांची मजल जात असल्याने प्रशासनाने अशा कंपन्यांवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा