Natepute Express
सर्व बातम्या
महाराष्ट्रNatepute Pratinidhi

'महायुतीत प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे':ऑडिओ क्लिप वादावर मंत्री जयकुमार गोरेंचा सल्ला, रामदास कदमांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

महाराष्ट्रात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना 500 कोटी दिल्याचा दावाही त्या क्लिपमध्ये करण्यात आला. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर सडकून टीका केली होती. यावर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम जे आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत, कथित ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवरच कुठेतरी टीका केली होती, यावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, कुठल्याच नेतृत्वाने एवढ्या फास्ट कुठल्या कन्क्लुजनवर जाणं उचित नाही. प्रत्येकाने विचार करून बोललं पाहिजे. जी परिस्थिती समोर आलेली आहे, ती क्लिप आहे, त्याचं वास्तव काय आहे? किंबहुना जे बोललं त्यात तथ्य काय आहे? या सगळ्याचा विचार करून आपण जेव्हा एकत्र काम करतो, महायुती म्हणून एकत्र आहे, त्या प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे. वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोललं

'महायुतीत प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे':ऑडिओ क्लिप वादावर मंत्री जयकुमार गोरेंचा सल्ला, रामदास कदमांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

महाराष्ट्रात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना 500 कोटी दिल्याचा दावाही त्या क्लिपमध्ये करण्यात आला. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर सडकून टीका केली होती. यावर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम जे आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत, कथित ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवरच कुठेतरी टीका केली होती, यावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, कुठल्याच नेतृत्वाने एवढ्या फास्ट कुठल्या कन्क्लुजनवर जाणं उचित नाही. प्रत्येकाने विचार करून बोललं पाहिजे. जी परिस्थिती समोर आलेली आहे, ती क्लिप आहे, त्याचं वास्तव काय आहे? किंबहुना जे बोललं त्यात तथ्य काय आहे? या सगळ्याचा विचार करून आपण जेव्हा एकत्र काम करतो, महायुती म्हणून एकत्र आहे, त्या प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे. वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोललं पाहिजे. पुढं अधिकची गडबड कुणी करू नये असं या माध्यमातून माझं सांगणं राहील सगळ्यांनाच. ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे मतदान झालं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर भाष्य करताना जयकुमार गोरे म्हणाले की, आपण काल पाहिला असेल की प्रचंड मोठा उत्साह मतदारांच्या मध्ये काल होता आणि ती मग पदवीधरची निवडणूक असेल किंवा शिक्षक मतदारसंघ असेल, ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे मतदान झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. शिक्षकांचं जवळ जवळ 90 टक्के मतदान शिक्षक मतदारसंघांमध्ये झालं आणि 62 टक्के मतदान आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही झालं नव्हतं एवढं मतदान काल झालेलं पाहिलं. खास करून सोलापूर जिल्ह्याने काल उच्चांकी मतदान केलंय. 72 टक्के मतदान हे महाराष्ट्रातलं सगळ्यात हायेस्ट मतदान हे सोलापूर जिल्ह्याने केलेलं आहे. दोन्ही सीट्स खूप मोठ्या प्रकारे निवडून येतील मी सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या पदवीधर बांधव असतील, आमचे शिक्षक बांधव असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल. त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सहकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतनं आपण बघितलं असेल की अख्खे बूथ काल प्रचंड चुरशीचं म्हणणारच नाही मी, एकतर्फी प्रचंड गर्दीचे परंतु एकतर्फी बूथ चालताना आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्यामुळे सुरुवातीला ज्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट केला होता की असं माहोल आहे, दिल्लीत असा आहे, राज्यात असा आहे, परंतु ते सगळं काल निकाली निघालं. आपल्याला 27 तारखेला दिसेल की या दोन्ही सीट्स म्हणजे पदवीधर असेल, शिक्षक असेल या दोन्ही सीट्स खूप मोठ्या प्रकारे निवडून येतील. बॅलेट पेपरच्या मतदानाचा काय निकाल लागू शकतो हे समजेल नॅरेटिव्ह सेट केलेला होता निवडणुकीपूर्वी की बॅलेट पेपर वर मतदान झाल्यानंतर भाजप किंवा सत्ताधारी पक्ष जे आहेत ते पराभूत होतात, या प्रश्नावर उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले, अशा पद्धतीने स्टेटमेंट आपण केली नाही. आपण पाहिलं असेल की विधान परिषदेची निवडणूक झाली आणि खूप कमी दिवसापूर्वी झालेली आहे ती बॅलेट पेपरवर होती. त्या निवडणुकीमध्ये केवढा मोठा पराभव झाला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, 365 मतांनी पराभव झालेला होता. आता आपल्याला उद्याच्या निवडणुकीत पाहता येईल की पदवीधर मतदारसंघातनं खऱ्या अर्थानं ते आपल्याला दिसेल की बॅलेट पेपरच्या मतदानाचा नक्की निकाल काय लागू शकतो. पाचही सीट्स महायुतीच्या निवडून येतील पुढे जयकुमार गोरे म्हणाले, वास्तविक पाहता पदवीधर उच्चशिक्षित मतदार सगळे होते त्यासोबत शिक्षक बांधव या ठिकाणी मतदार म्हणून होते. त्यामुळे त्यांना स्वतःचं मत असते, स्वतःचा विचार असतो, संघटना असतात त्याला वेगवेगळे कंगोरे या निवडणुकीला असतात. ते पक्षीय पातळीवरचा काय खूप त्याला मोठा विषय असा नसतो. परंतु भारतीय जनता पक्षाने या दोन्ही सीट्स लढवल्या महायुतीच्या माध्यमातून आणि मला खात्री आहे या दोन आणि राज्यातल्या एकूण पाच या पाचच्या पाचही सीट्स महायुतीच्या निवडून येतील. आमचं गुण्या गोविंदाने चाललंय नवीन माणसांचं भाजपमध्ये आल्यानंतर काय हाल होतं अशा पद्धतीचं विधान सुशील कुमार शिंदेनी केलं, त्यांनी मोदींचं कौतुक सुद्धा केलेलं आहे की चांगलं काम करतात, यावर प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे म्हणाले की, आता सुशील कुमार शिंदे साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. मला वाटतं एवढ्या जेष्ठ नेत्याच्या मतावर मी मत मांडणं उचित दिसत नाही. पण भारतीय जनता पक्षासोबत आलेले सगळे आमचे लोक इथं बघता आपण सगळे समाधानी आहेत आणि आमचं गुण्या गोविंदाने चाललेलं आहे. ऑडिओ क्लिपला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही ऑडिओ क्लिप आहे भाजपच्या विधान परिषदेच्या एका आमदाराने फोडली असं संजय राऊत यांनी दावा केला आहे. यावर जयकुमार गोरे म्हणाले, या संदर्भातली मला माहिती नाही किंवा ती ऑडिओ क्लिप किती सत्य आहे? आजकाल आपण बघतो एआय मध्ये एआय काही करू शकतो. आपण त्यामुळे ते आवाज कुणी कुणाचा आवाज तिथं एआयच्या माध्यमातून काढू शकतो, करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत त्या क्लिपबद्दल सत्यता काय आहे याची जर चौकशी होत नाही, जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत त्या क्लिपला मला वाटतं अधिकचं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. परंतु याची चौकशी होईल आणि त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा