Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

सोलापुरात लँडिंगवेळी विमानाचे चाकफुटून निखळले:महिला वैमानिक सुरक्षित, दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी क्रॉस कंट्री उड्डाणादरम्यानची घटना

सोलापूर विमानतळावर लँडिंगदरम्यान एका प्रशिक्षणार्थी विमानाच्या पुढच्या टायरचा अचानक स्फोट होऊन चाक निखळल्यामुळे हे विमान धावपट्टीवरच अडकून पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. विमानातील महिला वैमानिक ज्योती सतीश तन्वर (22) या पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. विमानातून थोडे ऑइल सांडले असले तरी ती गंभीर समस्या नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजून 2 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. हे विमान ‘क्रॉस कंट्री’ उड्डाणावर होते. त्याने सुरुवातीला कलबुर्गी येथून उड्डाण केले आणि प्रथम बारामतीला पोहोचले. त्यानंतर बारामतीहून सोलापूरला आले. सोलापूरहून विमानाला पुन्हा बारामतीला जायचे होते. मात्र, सोलापूरमध्ये लँडिंगदरम्यान विमानाच्या पुढच्या चाकाचा स्फोट होऊन चाक निखळले आणि ते धावपट्टीवरच थांबले. या विमानात पायलट ज्योती तन्वर या एकट्याच होत्या. घटनेनंतर विमानातून थोडे ऑइल सांडले,मात्र ती गंभीर समस्या नसल्याचे सोलापूर विमानतळाच्या व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी सांगितले.

सोलापुरात लँडिंगवेळी विमानाचे चाकफुटून निखळले:महिला वैमानिक सुरक्षित, दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी क्रॉस कंट्री उड्डाणादरम्यानची घटना

Plane's Wheel Bursts While Landing In Solapur, Female Pilot Safe, Incident During Cross country Flight At 2:02 Pm सोलापूर विमानतळावर लँडिंगदरम्यान एका प्रशिक्षणार्थी विमानाच्या पुढच्या टायरचा अचानक स्फोट होऊन चाक निखळल्यामुळे हे विमान धावपट्टीवरच अडकून पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. विमानातील महिला वैमानिक ज्योती सतीश तन्वर (22) या पूर्णपणे गुरुवारी दुपारी 2 वाजून 2 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. हे विमान ‘क्रॉस कंट्री’ उड्डाणावर होते. त्याने सुरुवातीला कलबुर्गी येथून उड्डाण केले आणि प्रथम बारामतीला पोहोचले. त्यानंतर बारामतीहून सोलापूरला आले. सोलापूरहून विमानाला पुन्हा बारामतीला जायचे होते.

मात्र, सोलापूरमध्ये लँडिंगदरम्यान विमानाच्या पुढच्या चाकाचा स्फोट होऊन चाक निखळले आणि ते धावपट्टीवरच थांबले. या विमानात पायलट ज्योती तन्वर या एकट्याच होत्या. घटनेनंतर विमानातून थोडे ऑइल सांडले,मात्र ती गंभीर समस्या नसल्याचे सोलापूर विमानतळाच्या व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी सांगितले. हे अपघातग्रस्त विमान रेडबर्ड या संस्थेचे आहे. विमानाचे चाक तुटल्यामुळे सध्या विमान धावपट्टीवरच थांबले असून, जोपर्यंत विमान तेथून हटवले जात नाही तोपर्यंत धावपट्टी बंद राहील. रेडबर्डचे पथक आज येऊन विमानातील बिघाड तपासणार रेडबर्डचे पथक शुक्रवारी घटनास्थळी पोहोचेल आणि विमानात नेमका काय बिघाड झाला, याचा तपास करेल. या तपासाचा अहवाल पूर्ण होऊन अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच हे विमान धावपट्टीवरून बाजूला करण्यात येईल. त्यानंतरच ही धावपट्टी उड्डाणांसाठी पुन्हा खुली केली जाईल असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तपासाच्या अहवालानंतरच विमान हटवणार विमानाचे चाक तुटल्यामुळे सध्या हे विमान धावपट्टीवरच थांबले आहे. जोपर्यंत अपघातग्रस्त विमान तेथून हटवले जात नाही तोपर्यंत सोलापूरची धावपट्टी बंद राहील. शुक्रवारी रेडबर्डचे तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचून या बिघाडाचा तपास करेल. या तपासाचा अहवाल पूर्ण होऊन अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच हे विमान धावपट्टीवरून बाजूला करण्यात येईल आणि धावपट्टी अन्य उड्डाणांसाठी पुन्हा खुली केली जाईल. टायरची खराब अवस्था, क्षमतेपेक्षा जास्त झालेली झीज अपघाताचे कारण ठरू शकते विमानाच्या टायर फुटण्याच्या घटनेमागे धावपट्टीचा दोष असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण तसे असते तर विमानाचे सर्वच टायर खराब झाले असते. या अपघाताचे मुख्य कारण हे टायरची खराब अवस्था, क्षमतेपेक्षा जास्त झालेली झीज, एखादी टोकदार वस्तू लागणे किंवा पायलटकडून लँडिंग करताना झालेली चूक असू शकते.

विमानतळ प्राधिकरणाने लँडिंगपूर्वी धावपट्टीची पूर्व-तपासणी करणे आणि विमान कंपन्यांनी त्यांच्या टू-डू चेकलिस्टचे काटेकोरपणे पालन करत वेळेवर टायर बदलणे किंवा सर्व्हिसिंग करणे अत्यंत गरजेचे असते. देखभाल आणि दुरुस्तीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालतंय अशी तडजोड करणारी वृत्ती प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करत असल्याने अशा प्रकरणात सर्व सुरक्षा नियमांचे 100 टक्के पालन होणे अनिवार्य आहे. नाक धावपट्टीवर घासले गेल्याने विमान अडकले अपघातानंतर विमान तसेच ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या तपासणीनंतर धावपट्टी सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा