Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

मोडनिंबमध्ये फुलांची उधळण करत कृष्ण जन्माष्टमी सोहळा

कृष्ण जन्माचा सोहळा झाल्यानंतर रात्री यमाई मंदिर परिसरात फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फुलांच्या वर्षावात भाविकांनी श्री कृष्णाचा जयघोष करत आनंद साजरा केला. यावेळी मसाला दूध वाटप करण्यात आले. मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाची शनिवारी दिंडी प्रदक्षिणा व काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. या सप्ताहाला सुमारे 150 वर्षांची अखंड परंपरा आहे. या वेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सप्ताहात विविध कीर्तनकारांची कीर्तने झाली. तसेच काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम नित्यने दररोज पार पडले. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी आठ वाजता दिंडी ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. जयदीप महाराज सावंत यांचे काल्याचे कीर्तन झाले.कै. अंबादास विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. सप्ताहानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली होती.

मोडनिंबमध्ये फुलांची उधळण करत कृष्ण जन्माष्टमी सोहळा

Krishna Janmashtami Celebrations With Flowers In Modnimb, Ending The Akhand Harinam Week; A Tradition Of About 150 Years Continues Even Today कृष्ण जन्माचा सोहळा झाल्यानंतर रात्री यमाई मंदिर परिसरात फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फुलांच्या वर्षावात भाविकांनी श्री कृष्णाचा जयघोष करत आनंद साजरा केला. यावेळी मसाला दूध वाटप करण्यात आले. मोडनिंब (ता. माढा) येथील श्री यमाई देवी मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाची शनिवारी दिंडी प्रदक्षिणा व काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. या सप्ताहाला सुमारे 150 वर्षांची अखंड परंपरा आहे. या वेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या सप्ताहात विविध कीर्तनकारांची कीर्तने झाली.

तसेच काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम नित्यने दररोज पार पडले. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सकाळी आठ वाजता दिंडी ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. जयदीप महाराज सावंत यांचे काल्याचे कीर्तन झाले.कै. अंबादास विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. सप्ताहानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. तसेच फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी खंदारे नाना, नानासाहेब सुर्वे, शीतल सुर्वे, राजू महामुनी, उल्हास काळे, दिगंबर सुर्वे, विजयनाथ पवार, शीतल महाडिक यांच्यासह यमाई ट्रस्ट व जय भवानी चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शनिवारी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरातून दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात भाविक दिंडीत सहभागी झाले.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा