On The Occasion Of Lalit Panchami, A Collective Naming Ceremony Will Be Held Across The State At The Same Time, An Initiative Of The Samarth Nagri Family; It Will Also Be Organized In Maharashtra, Goa, Karnataka And America. अक्कलकोट स्टेशन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमन दिनानिमित्त ललित पंचमीला राज्यभर एकाच वेळी सामूहिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील समर्थ नगरी परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येणार असून सर्व स्वामीभक्तांनी आपल्या गावात एकत्र येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि स्वामीचरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन समर्थ नगरी अध्यात्मिक समितीच्या अध्यक्षा सुखदा ग्रामोपाध्ये यांनी केले आहे. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आणि वे. शा. सं. अण्णू महाराज (श्री स्वामीभक्त चोळप्पा महाराज यांचे वंशज) यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनातून नामप्रसार परिक्रमा राबवण्यात आली. या परिक्रमेदरम्यान ललित पंचमीचे महत्त्व सांगून, सर्व ठिकाणी एकाच दिवशी आणि एकाच वेळी सामूहिक नामस्मरण करण्याचे नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्रासह विविध राज्यांत आयोजन अक्कलकोट, सोलापूर, बार्शी, सांगोला, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह महाराष्ट्रातील विविध शहरांत हा सोहळा होणार आहे. कर्नाटकातील गुलबर्गा, शाहबाद, चिकोडी, बेळगाव आणि बंगळुरू तसेच गोवा, राजस्थान व अमेरिकेतही नामस्मरणाचे नियोजन करण्यात आले आहे. समर्थ नगरीच्या माध्यमातून साधनावर्ग सुरू समर्थ नगरीच्या माध्यमातून स्वामीनामप्रसाराची सेवा केली जाते. हजारो भक्तांना दररोज स्वामींचे दर्शन घडविण्यासह विविध ठिकाणी साधनावर्ग सुरू करून नामस्मरणाची सेवा रुजविण्याचे कार्य केले जात आहे. स्वामींचा अक्कलकोट आगमन दिन राज्यभर नामस्मरणातून साजरा होत असून, सर्व भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. - महेश इंगळे, चेअरमन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट पाचव्या माळेनिमित्त विश्वशांती आणि मनःशांतीसाठी गुरुवारी सायंकाळी 5.25 वा नामस्मरण गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवातील पाचव्या माळेनिमित्त ललित पंचमी साजरी होणार आहे.
या दिवशी सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी अक्कलकोटसह विविध ठिकाणी विश्वशांती आणि मनःशांतीसाठी सामूहिक नामस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अक्कलकोट येथे सकाळी 11 वाजता सोलापूर रोडवर श्री स्वामी समर्थ महाराजांचे विधिवत पूजन करून स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.25 वाजता लोकापूरे मल्टिपर्पज हॉल येथे सामूहिक नामस्मरण होईल.