Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

कुर्डुवाडी- माढा रोड अतिक्रमण मुक्त‎पालिकेची कारवाई

कुर्डुवाडी शहरातील माढा रोडने अखेर मोकळा श्वास घेतला असून मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा केवळ औपचारिक कारवाई न करता, नगरपालिकेने अतिक्रमण कायमस्वरूपी रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हटवण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी पुन्हा विक्रेत्यांनी ठाण मांडू नये, यासाठी नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी दैनंदिन काम उरकून या परिसरावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. विशेष म्हणजे, अमृत भारत योजनेतून नव्याने उभारण्यात आलेली रेल्वे जंक्शनची सुंदर व देखणी इमारत या अतिक्रमणामुळे पार झाकली गेली होती. मात्र, हा परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाल्यामुळे ही भव्य इमारत आता पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासनाने माढा रोडवरील सर्व अतिक्रमणे हटवली होती. सामान्यतः अशी कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्ते पुन्हा अतिक्रमणाने व्यापले जातात.

कुर्डुवाडी- माढा रोड अतिक्रमण मुक्त‎पालिकेची कारवाई

कुर्डुवाडी शहरातील माढा रोडने अखेर मोकळा श्वास घेतला असून मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा केवळ औपचारिक कारवाई न करता, नगरपालिकेने अतिक्रमण कायमस्वरूपी रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हटवण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी पुन्हा विक्रेत्यांनी ठाण मांडू नये, यासाठी नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी दैनंदिन काम उरकून या परिसरावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. विशेष म्हणजे, अमृत भारत योजनेतून नव्याने उभारण्यात आलेली रेल्वे जंक्शनची सुंदर व देखणी इमारत या अतिक्रमणामुळे पार झाकली गेली होती.

मात्र, हा परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाल्यामुळे ही भव्य इमारत आता पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासनाने माढा रोडवरील सर्व अतिक्रमणे हटवली होती. सामान्यतः अशी कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्ते पुन्हा अतिक्रमणाने व्यापले जातात. मात्र, या वेळी कुर्डुवाडी नगरपालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करून मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाला पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, विक्रेत्यांसाठी नगरपालिकेने भाजी व फळविक्रेत्यांना अंतर्गत रस्त्यांवर भाजी विक्रीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे.

कुर्डुवाडीशहरातील माढा रस्त्यावरील अतिक्रमणे नगरपालिकेने काढल्याने रस्ता मोकळा दिसत होता. दरम्यान, शहरातील इतर रस्त्यांवर बेकायदेशीररीत्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांसमोरच रस्त्यावर कायमस्वरूपी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणेही नगरपालिकेने तात्काळ हटवावीत; अन्यथा झालेली कारवाई केवळ गोरगरीब टपरीधारकांवर अन्याय करणारी ठरेल, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोणताही पक्षपात न करता शहरातील इतर सर्व भागांतील अतिक्रमणे काढावीत आणि रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. कुर्डुवाडी शहरातील टेंभुर्णी रोड, माढा रोड आणि पंढरपूर रोडचे सुमारे 50 ते 60 फूट रुंदीचे सिमेंट काँक्रिटिकरण झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, माढा रोडवर भाजी-फळ विक्रेते आणि टपऱ्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा रस्ता अत्यंत अरुंद बनला होता. अतिक्रमणामुळे शहराला बकाल स्वरूप आले होते आणि दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक व पादचारी प्रचंड त्रस्त झाले होते.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा