Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले

पंढरपूर बैलपोळा हा सण जेमतेम दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरीही दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात मंदीचा माहोल आहे. पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने व स्टॉलवर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, ऊस बिलातील बैल पोळा हफ्ता पंढरपूर तालुक्यातील एकाही साखर कारखान्याने जाहिर केलेला नाही, त्यामुळे हफ्ता कधी मिळ णार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे, पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून केळी, बेदाणा आणि डाळिंबाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखर कारखान्यांकडून पोळ्याचा हप्ता तर दूरच, पण मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तंगी जाणवत आहे. पंढरपूर शहरातील नवी पेठ परिसरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बैल व इतर जनावरांना लागणाऱ्या साहित्याची दुकाने व स्टॉल थाटण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी उलाढाल होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, दोन दिवसांवर सण आला तरी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद असल्याने शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीही चिंतेत आहे

बैलपोळ्यासाठीच्या साहित्याचे दर वाढले

Prices Of Materials For Bullock Carts Have Increased, Livestock Farmers Are Worried, Attention Is Being Paid To The Sugar Factory's Bullock Cart, Farmers Are Struggling To Buy Materials For Animals पंढरपूर बैलपोळा हा सण जेमतेम दोन दिवसांवर येऊन ठेपला असला तरीही दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात मंदीचा माहोल आहे. पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने व स्टॉलवर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, ऊस बिलातील बैल पोळा हफ्ता पंढ यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे, पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून केळी, बेदाणा आणि डाळिंबाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखर कारखान्यांकडून पोळ्याचा हप्ता तर दूरच, पण मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळणे अद्याप बाकी आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तंगी जाणवत आहे. पंढरपूर शहरातील नवी पेठ परिसरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बैल व इतर जनावरांना लागणाऱ्या साहित्याची दुकाने व स्टॉल थाटण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी उलाढाल होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, दोन दिवसांवर सण आला तरी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद असल्याने शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीही चिंतेत आहेत. गुरुवारी बैलपोळा साजरा होत असल्याने येत्या दोन दिवसांत पशुपालक शेतकरी साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करतील, असा अंदाज आहे. तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील बाजरीसह अन्य पिके संकटात आहेत. केळी, बेदाणा व डाळिंबाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे. पाण्याअभावी उसाचे उभेप पिक वाळू लागले आहे, तर दुसरीकडे साखर कारखान्यांकडून थकीत रक्कम मिळालेली नाही.

  • सुती कासरा 225 ते 250 रुपये नग
  • वेसन: 90 ते 120 रुपये नग
  • म्होरकी :200 ते 240 रुपये नग
  • कवडीमाळ : 550 ते 650 रुपये
  • झुल : 2500 ते 3000 रुपये बाशिंग : 2 हजार ते 2500 रुपये
  • घुंगरू पट्टा 1200 ते 1600 रुपये
  • सूत : 1200 ते 1450 रुपये किलो.

सजावट साहित्याची दर वाढ बैलांसह जनावरांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याने पोळा साजरा करताना शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांकडून काटकसर सुरू असून बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसत आहे. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा