Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी

गणेशोत्सवात डीजेला पूर्णतः बंदी घालण्याच्या घोषणेवरून अवघ्या 52 तासांतच पोलिस प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. रविवारी शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आक्रमकपणे डीजेमुक्त शहराची घोषणा केली होती. मात्र, डीजेचालकांनी घातलेला घेराव आणि राजकीय दबावापुढे झुकत 115 डीजेचालकांच्या बैठकीत थेट बंदीऐवजी आता 2 बेस आणि 2 टॉप स्पीकर्ससह साउंड सिस्टिमला परवानगी देण्याचा ‘सुवर्णमध्य’ पोलिसांकडून काढण्यात आला आहे. डेसिबल मोजून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांना दिला होता. दरम्यान, दोन बेस, दोन टॉपची मैदानावर चाचणी घेतली असून आवाज मर्यादेत राहतो. प्रत्येक ठिकाणी डेसिबल मोजून कारवाई होईल. डीजे स्पर्धांवर बंदी असून उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले. चौकात दोन डीजेंच्या स्पर्धेला पूर्णतः बंदी परजिल्ह्यातून शहरात मोठे डीजे आणून चौकाचौकात समोरासमोर आवाजाची स्पर्धा लावण्याच्या प्रकारावर पूर्णतः बंदी असेल.

डीजे बंदीबाबत संभाजीनगर पाेलिसांचा 3 दिवसांत ‘यू-टर्न’:नव्या नियमात 2 बेस व 2 टाॅपला मंजुरी

Sambhajinagar Police 'U turn' In 3 Days Regarding DJ Ban, New Rules Allow 2 Bases And 2 Tops, Volume Will Have To Be Limited, Commissioner's Responsibility If Rules Are Violated: Guardian Minister गणेशोत्सवात डीजेला पूर्णतः बंदी घालण्याच्या घोषणेवरून अवघ्या 52 तासांतच पोलिस प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. रविवारी शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आक्रमकपणे डीजेमुक्त शहराची घोषणा केली होती. मात डेसिबल मोजून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांना दिला होता. दरम्यान, दोन बेस, दोन टॉपची मैदानावर चाचणी घेतली असून आवाज मर्यादेत राहतो. प्रत्येक ठिकाणी डेसिबल मोजून कारवाई होईल. डीजे स्पर्धांवर बंदी असून उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सांगितले. चौकात दोन डीजेंच्या स्पर्धेला पूर्णतः बंदी परजिल्ह्यातून शहरात मोठे डीजे आणून चौकाचौकात समोरासमोर आवाजाची स्पर्धा लावण्याच्या प्रकारावर पूर्णतः बंदी असेल.

यात 100 डेसिबलहून अधिक आवाज आणि अश्लील गाण्यांचा वापर होतो. बाहेरून येणाऱ्या डीजेंना रोखण्यासाठी नाकेबंदी केली जाणार आहे. शांतता समितीच्या बैठकीला मला बोलावले नव्हते, पत्रिकेवर नावही नव्हते. त्यामुळे पोलिस आयुक्तांकडे मागणी करण्याचा संबंधच येत नाही. मी त्यांना कोणताही फोन किंवा सूचना केलेली नाही. - विलास भुमरे, आमदार डीजे सिस्टिम अन् 2 बेस - 2 टॉपमधील फरक 1 स्पीकर्स: पूर्ण डीजेत 6 ते 12 बेस व 8 ते 16 टॉप स्पीकर्स असतात. नव्या नियमात केवळ 2 बेस आणि 2 टॉप असतील. 2 आवाजाची तीव्रता: डीजे छातीत धडधड निर्माण करतो. 110 ते 130 डेसिबलवर. नव्या सिस्टिममध्ये तो मर्यादित. 3 सेटअप: पूर्ण डीजे मोठ्या ट्रक्सवर लावला जातो, तर नवी सिस्टिम छोट्या टेम्पोतही बसवता येऊ शकतात. 4 भाडे: पूर्ण डीजेचे भाडे 50 हजारांपासून अडीच लाखांपर्यंत असते. नव्या सिस्टिमचे भाडे 15 ते 35 हजार रुपये प्रतिदिवस. 

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा