Natepute Express
सर्व बातम्या
सोलापूर जिल्हाNatepute Pratinidhi

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎ नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना

मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णसेवा, औषधसाठा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. बैठकीच्या प्रारंभी पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून जन आरोग्य समितीची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धतीची माहिती दिली. समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी, औषध कक्ष, औषधसाठा, रुग्ण तपासणी कक्ष, लसीकरण विभाग, प्रसूती कक्ष, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, साधनसामग्री आणि रुग्णांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

मानेगाव आरोग्य केंद्र इमारत मोडकळीस‎ नव्याने बांधण्याची सावंतांनी केली सूचना

मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीपूर्वी समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णसेवा, औषधसाठा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. बैठकीच्या प्रारंभी पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून जन आरोग्य समितीची स्थापना, उद्दिष्टे, कार्यपद्धतीची माहिती दिली. समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी, औषध कक्ष, औषधसाठा, रुग्ण तपासणी कक्ष, लसीकरण विभाग, प्रसूती कक्ष, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, साधनसामग्री आणि रुग्णांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. या वेळी जन आरोग्य समिती सदस्य शाखा अभियंता चव्हाण, विस्तार अधिकारी संतोष पोद्दार, श्रीमती भोगे, तेजस गोसावी, बिरूदेव शेळके तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश खेंदाड, औषधनिर्माण अधिकारी तानाजी खंडागळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आढावा घेतला. कर्मचारी, अधिकारी यांना सूचना दिल्या. आरोग्य व्यवस्था सुरळीत होण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.

• रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा

• बुद्रुकवाडी व जामगाव येथील पूर्ण झालेल्या उपकेंद्रांच्या पदभरतीचा प्रश्नी पाठपुरावा

• वाकाव व दारफळ-सीना येथील मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जागा व बांधकामाचा आढावा

• औषधसाठा, स्वच्छता, लसीकरण, प्रसूती, पिण्याचे पाणी व वीज व्यवस्थेची पाहणी. मागील वर्षीचा निधी व चालू निधीच्या नियोजनावर चर्चा.

Source: Maharashtra

ही बातमी उपयोगी वाटली?मित्र आणि कुटुंबासोबत WhatsAppवर share करा.
WhatsAppवर Share करा