Three Restaurants Including ISKCON's 'Govinda' In Mumbai And 19 Licenses In The State Suspended, FDA Takes Action For Violation Of Food Safety Standards जुहूतील इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) संकुलातील गोविंदा रेस्टॉरंटसह 3 प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने एफडीएने निलंबित केले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन, अस्वच्छता व कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई केली. यासह कीटकांचा प्रादुर्भाव, सांडपाणी साचलेले इस्कॉन (हरे कृष्ण लँड, जुहू): पाणी गुणवत्तेचे प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नव्हते. कीटक व किडींचा प्रादुर्भाव आढळला. अन्न व गैर-अन्न वस्तूंची एकाच ठिकाणी साठवणूक होती.
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरण केलेले नव्हते. इस्कॉन फूड सर्व्हिसेस रेस्टॉरंट (जुहू): किचनचा मागील दरवाजा उघडा होता. पदार्थ तपासणीसाठी अंतर्गत प्रयोगशाळेची व्यवस्था नव्हती. सांडपाण्याची ड्रेनेजलाइन चोक झालेली होती. धान्याच्या स्टोअर रूममध्ये कीटकांच्या विष्ठेचे अवशेष आढळून आले. इस्कॉन गोविंदा रेस्टॉरंट (जुहू): पाण्याचे आयएस:10500’ मानकांनुसार गुणवत्ता अहवाल दिले नाहीत. कोल्ड स्टोअरेज युनिटमध्ये पाणी साचले होते. स्वयंपाकघरात ग्रीस, झुरळांच्या ट्रॅपचा अभाव होता.