राज्यात दीड लाख कर्मचारी भरती:पारदर्शक, प्रामाणिक, गतिशील काम करा; 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करा, CM देवेंद्र फडणवीसांचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आगामी शंभर दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये दीड लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. सर्व यंत्रणा या तांत्रिक दृष्ट्या सक्षम करून लोकांना कशाप्रकारे चांगली सेवा देता येईल, याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महाराष्ट्र हे देशातील नंबर एकचे राज्य आहे. परंतु याचा अर्थ अधिकाऱ्यांनी थांबावे असा होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आणि भविष्यात देखील त्यांनी चांगली कामगिरी करावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासकीय कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला सेवा देण्यासाठी राज्यात शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश देखील फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील प्रमुख योजनांना समर्पित अशी वार रूम करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच संयुक्त बैठक होती. यामध्ये राज्याच्या धोरणाचे नेतृत्व हे अधिकारीच करतील, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. याच बरोबर पारदर्शक, प्रामाणिक आणि गतिशील काम करण्याचा सल्ला देखील फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. दिल्लीतही वॉर रूम केंद्र सरकारशी संबंधीत कामाची गती वाढवण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. या माध्यमातून राज्य सरकारचे दिल्लीतील कामे गतिशील होतील. त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. माहितीचा अधिकार राज्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, सरकारी कार्यालयात येणाऱ्या लोकांना सुलभतेवर भर देण्यात यावा. त्यासाठी सर्व सरकारी पोर्टलचा त्यांच्या पूर्ण क्षमतेने वापर करून लोकांना घराच्या बाहेर न पडता सर्व सेवा मिळू शकेल. तसेच सर्व नोकरशहांच्या विभागीय पोर्टलवर माहितीचा अधिकार सेवा देण्यासाठी तशी अनुकूल बनवण्याचे आदेश देखील फडणवीस यांनी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले महत्त्वाचे आदेश