शहरातील मध्य मतदारसंघात चुरस:गेल्या वेळी 13,892 लीड, यंदा 15,247 मतदारांच्या संख्येत वाढ, जिल्ह्यातील 9 मतदारसंघांत लोकसभेनंतर वाढले 96,459 मतदार

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील मध्य मतदारसंघात सर्वाधिक 15,247 हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचे मताधिक्य 13,892 होते. आता विजयाच्या फरकापेक्षा नव्या मतदारांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर ‘पूर्व’ मतदारसंघात 11,226 मतदार वाढले आहेत. गेल्या वेळी भाजपचे अतुल सावे 13,930 मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या मताधिक्याच्या जवळपास नवे मतदार आहेत. त्याचबरोबर ‘पश्चिम’, गंगापूर, सिल्लोड, फुलंब्री या मतदारसंघांमध्येही 10 हजारांपेक्षा जास्त मतदारांची वाढ झाली आहे. मात्र, तेथे गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे मताधिक्य तुलनेत जास्त होते. जिल्ह्यात कन्नड मतदारसंघात सर्वात कमी 3 हजार मतांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीनंतर 96,459 मतदार वाढले आहेत. मतदार, आधार कार्ड जोडल्यास बसेल लगाम अनेक वेळा कागदपत्रात खाडाखोड करून बोगस मतदार नोंदणी केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आधार कार्ड सोबत मतदान कार्ड लिंक केल्यास बोगस मतदार नोंदणीला आळा बसेल. याबाबत आयोगाला विनंती देखील केल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थलांतरित मतदार नोंदणीला नाहीत नियम आपल्या सोयीच्या मतदारांची नावे उमेदवार आपल्या मतदारसंघात नोंदवून घेतात. स्थलांतरित मतदार नोंदणीसाठी कोणताही नियम नसल्याने निवडणूक विभाग हतबल असल्याचे बोलले जात आहे. बनावट मतदारांवर कठोर कारवाई बोगस मतदार नोंदणी करणे गुन्हा असून, असे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. लोकसभेनंतर जुलै 2024 पर्यंत ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झाले आहे अशांची नोंदणी झाली आहे. सध्या झालेली नाव नोंदणी सर्वसामान्य आहे. अनेक जण दोन ठिकाणी नाव नोंदवतात, जुने कार्ड हरवल्यास नवीन नोंदणी करतात. आम्ही छाननी करतोच मात्र, काही चुका राहू शकतात. – देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बनावट कागदपत्रांआधारे नाव नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हा वीजबिलात खाडाखोड करून मतदान यादीत दुबार नाव नोंदणी करण्याचा प्रयत्न ‘पूर्व’ विधानसभा मतदारसंघात करण्यात आला होता. छाननीदरम्यान ही बाब लक्षात येताच वीजबिलाची पडताळणी करण्यात आली. यामध्ये संबंधित वीज ग्राहक दुसरेच असून, बिलांवर खाडाखोड केल्याचे निदर्शनास आले होते. बनावट नोंदणी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Share

-