लोकसहभागातून शाळांमध्ये बसवले 200 सीसीटीव्ही:शाळांतील लाखो विद्यार्थी झाले सुरक्षित

बदलापूर येथील चिमुरडीवर शाळेत झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात सर्वच पालकांच्या मनात मोठे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पालक आपल्या पाल्याना शाळेत पाठवताना विचार करायला लागली होती. सरकारने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिले. काही शाळांनी कॅमेरे लावलेही मात्र सरकारी शाळा यामध्ये पाठीमागे राहिल्याचा पाहायला मिळाल्या. यामुळे फुलंब्री बाजार समितीच्या सभापती अनुराधा अतुल चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, होर्डिंग्स, बॅनर, भेटवस्तू न आणता शाळेत सीसीटीव्ही लावण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यामध्ये सभापती अनुराधा चव्हाण यांनी देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार लावत फुलंब्री मतदार संघातील तब्बल दोनशे पेक्षा अधिक शाळांत सीसीटीव्ही संच लावले आहेत. किनगावला आदर्श गाव म्हणून पुढे आणणाऱ्या सभापती अनुराधाताई चव्हाण यांनी नेहमीच नावीन्यपूर्ण संकल्पनांमधून आपल्या कार्याची छाप फुलंब्री मतदार संघावर सोडली आहे. अशा वेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी आंदोलने केली, मोर्चे काढले पण लेकींच्या सुरक्षिततेची चिंता केली ती अनुराधा चव्हाण यांनीच, फक्त चिंता व्यक्त करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी लेकींना सुरक्षित करण्यासाठी स्वतः पुढाकार घेत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदार संघातील मतदारांनी त्यांच्या परीने सहकार्य करत मोठा प्रतिसादही दिला. मतदारांच्या मोलाच्या सहकार्यामुळे सभापती चव्हाण यांनी तब्बल दोनशे शाळात सीसीटीव्ही बसवून दिले आहे. यामुळे मतदार संघातील लाखो मुले सुरक्षित झाली असून सीसीटीव्हीची नजर असल्याने आता पालक देखील मुलांच्या काळजी करण्यापासून मुक्त झाले आहे. मुली सुरक्षित झाल्या याचे समाधान फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधाताई चव्हाण म्हणाल्या, मुली सुरक्षित राहाव्या याबाबत तर सर्वच बोलतात. मात्र बोलन्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून मुली सुरक्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नाला मतदार संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी देखील मोलाचे सहकार्य केले आहे. आतापर्यंत दोनशे शाळेत आम्ही कॅमेरे लावले असून पालकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे. येत्या काळात आणखी शाळेत आम्ही कॅमेरे लावणार आहोत.

Share

-