254 किमी सायकल प्रवास करुन शंभुराजेंना अभिवादन:वारी परिवाराची मंगळवेढा- वढू बुद्रूक मोहिमेची सांगता, सायकलस्वारांचा केला गौरव

वारी परिवाराची मंगळवेढा-तुळापूर-वढू बुद्रुक ही ऐतिहासिक सायकल मोहीम खरोखरचं आजच्या तरुणांना आदर्शवत आहे ,असे मत सॅप पार्टसचे पार्थ प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. वारी वारी परिवाराच्या मंगळवेढा ते वढू बुद्रुक ऐतिहासिक सायकल मोहीमेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रिता कुलकर्णी, वैशाली कसगावडे, आशा आवताडे, पल्लवी हजारे, अनुसया आवताडे आदी उपस्थित होते. कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, छत्रपती संभाजी महारांजांची तुळापूर आणि वढूबुद्रुक समाधीस्थळे तरुणांना माहित व्हावीत त्याचा प्रसार करण्यासाठी २५४ किलोमीटरचा टप्पा सायकलवरती पूर्ण करून महाराजांच्या समाधीस वंदन करून सर्व सायकल स्वारांनी आदर्श उभा केला आहे असे सांगून सर्वांचे स्वागत केले. सायकल यात्रा तुळापुर येथे आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दीपोत्सव करून पूजन करण्यात आले. या ठिकाणाची माहिती तरुणांना व्हावी तसेच पर्यटन विकास जनजागृतीसाठी माहितीपर पत्रके वाटून प्रबोधन करण्यात आले. मोहीमेकरीता सॅप पार्टसचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद कुलकर्णी,अंकुश आवताडे यांचे विशेष सहकार्य लाभले. ऐतिहासिक सायकल मोहीमेत सहभागी झालेल्या सर्व सायकलस्वारांचा मोहीम फत्ते केल्याबद्दल समाधी स्थळासमोर सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले तर आभार अरुण गुंगे यांनी मानले.

Share

-