रिक्षासह एसटीतून गांजाची तस्करी, करणाऱ्या आरोपीना बेड्या:4 लाख 50 हजारांचा गांजा आणि रिक्षा जप्त

रिक्षासह एसटीतून गांजाची तस्करी करणार्‍या आरोपीना खडकी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ५० हजारांचा गांजा आणि रिक्षा जप्त केली आहे. अफजल सनाउल्ला सय्यद (वय ३९ रा. मु.पो.दिघीहाटी,ता. वेल्हा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खडकी पोलिस ठाण्यातील बीट मार्शल ७ नोव्हेंबरला पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पुणे मुंबई जुना हायवेवरील कामगार आयुक्तालयासमोर रिक्षा जवळून जाताना बीट मार्शलांना गांजाचा वास आला. त्यांनी रिक्षाची तपासणी केली असता, गांजा आढळून आला. पथकाने अफजल सनाउल्ला सय्यद याला ताब्यात घेउन ५ किलो ६३० ग्रॅम गांजा जप्त केला. दुसर्‍या कारवाईत पोलिसांनी एसटीमधून गांजाची तस्करी करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० किलो गांजा जप्त केला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश जगदाळे, पोलिस निरीक्षक गजानन चोरमले, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, आशिष पवार,संदेश निकाळजे,शिवराज खेड, सुधाकर राठोड, सुधाकर तागड यांनी केली. पादचार्‍याचा मोबाइल हिसकाविला रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तरूणाच्या हातातील १५ हजार रूपयांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना शनिवार पेठेतील रमणबाग शाळेजवळ घडली आहे. याप्रकरणी तरूणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण शनिवार पेठेत राहायला असून, ते रमणबाग शाळेजवळून पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना अडवून हातातील १५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी पोलिस अमलदार सुरवसे तपास करीत आहेत.

Share