4 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरण:पसार आराेपी जेरबंद, पुणे गुन्हे शाखेची कारवाई

एका ओळखीच्या मानलेल्या बहिणीच्या चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन पसार झालेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. अत्याचार केल्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून मागील दोन दिवसपासून शोध घेतला जात होता. विजय स्वामी बामु (वय 40, रा. घोरपडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बामु याने मानलेल्या बहिणीच्या चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी आरोपीवर मुंढवा पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल झाला करण्यात आला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर स्थानिक रहिवासी संतप्त झाले होते. गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक मुंढवा परिसरात गस्त घालत होते. रेल्वे उड्डाणपुलाजवळ आरोपी बामू थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी विक्रांत सासवडकर यांना मिळाली. सापळा लावून पोलिसांनी त्याला पकडले. पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली छबू बेरड, दत्तात्रय खरपुडे, विनायक रामाणे, गणेश गोसावी, संदीप येळे यांनी ही कारवाई केली. आरोपीला मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून शाळकरी मुलांवरील अत्याचााराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. शाळांमध्ये योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. समुपदेशानमुळे अत्याचारांच्या गुन्ह्यांना मुलांकडून वाचा फुटत आहे. खरेदीसाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरी आगामी दिवाळी सण निमित्त लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली.याबाबत महिलेच्या पतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिचे पती कात्रज भागात राहायला आहेत. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ते मंगळवारी सायंकाळी लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी आले होते. बेलबाग चौकातून ते पदपथावरुन सेवासदन चौकाकडे निघाले होते. पदपथावर गर्दी होती. गर्दीत महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. महिलेच्या लक्षात हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस हवालदार सचिन अहिवळे पुढील तपास करत आहेत.

Share

-