मराठवाड्यात 45 हजार शिक्षकांना‎ यंदा मिळणार नाही सणाचा अग्रिम:जिल्हा परिषदांना अग्रिमची मागणी न नोंदवण्याचे निर्देश ‎

जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुरुजींना यावर्षीही सणाचा‎अग्रिम मिळणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील ४५‎हजार गुरुजींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे‎या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयानेही कानावर‎हात ठेवले आहे. गेल्यावर्षीदेखील शिक्षकांना अग्रिम‎मिळाला नव्हता.‎ मराठवाड्यातील आठही जिल्हा परिषदांमधून जिल्हा‎परिषदेचे ४५ हजार शिक्षक कार्यरत आहेत. या‎शिक्षकांना शैक्षणिक उपक्रमाच्या अमंलबजावणी‎सोबतच, निवडणूक व इतर अशैक्षणिक कामेही करावी‎लागत आहेत. मात्र अनेकदा शिक्षकांनावर विनाकारण‎अशैक्षणिक कामे लादली जात असल्याचा आरोप,‎शैक्षणिक संघटनांमधून केला जात आहे. एकीकडे‎शासकीय योजनांच्या अंमबजावणीसाठी शिक्षकांना पुढे‎केले जाते. तर सणांच्या अग्रिमसाठी त्यांना डावलले‎जात असल्याची ओरड होत आहे. दरम्यान,‎शासनाकडून यापुर्वी शिक्षकंना १५००० रुपये फेस्टीव्हल‎अग्रीम दिला जात होता. अग्रिम रकमेचे दर महिन्याला‎१५०० रुपये या प्रमाणे १० महिन्यात कपात केली जात‎होती. मात्र मागील वर्षी शिक्षकांना अग्रीम देण्यात आला‎नाही. त्यामुळे शिक्षकांनी या संदर्भात वारंवार जिल्हा‎परिषदेकडे विचारणा केली. त्यावेळी अग्रिमची तरतूदच‎करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे‎मागील वर्षी विविध शिक्षक संघटनांनी शासनाकडे‎निवेदन सादर करून, अग्रीम देण्याची विनंती केली होती.‎ मागणीसाठी निवेदन दिले‎‎ जिल्हा परिषदेअंतर्गत वर्ग तीन व‎चार संवर्गातील ४८०० पेक्षा कमी ग्रेड‎पे असलेल्या कर्मचाऱ्यांना,‎फेस्टीव्हल अग्रीम लागू असल्याचा‎शासन निर्णय आहे. मागील वर्षीच‎शासनाकडे अग्रिमसाठी निवेदन‎दिले होते. यावर्षीही शिक्षकांना‎अग्रीम दिले जात नसेल तर‎आंदोलन उभारू , असे मध्यवर्ती‎शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष केशव‎जाधव यांनी सांगितले.‎ शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून अग्रीम द्यावा‎ राज्यातील शिक्षकांना यापुर्वी सणाचा अग्रिम दिला होता. मात्र मागील‎वर्षी अग्रीम दिला नाही, तर यावर्षीही अग्रिम न देण्याबाबत सूचना व्हायरल‎होत आहे. शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अग्रिम द्यावा.‎-सुभाष जिरवणकर, शिक्षक‎ संचालकांचा आदेश व्हायरल ‎ यावर्षी शिक्षकांना अग्रिम दिला ‎जाणार नसल्याचे सांगण्यात आले ‎आहे. या शिवाय पुणे येथील ‎संचालक कर्यालयाच्या आदेशानुसार ‎कोणत्याही जिल्हा परिषदेने अग्रिम ‎मागणी नोंदवू नये असा संदेश व्हायल ‎होत आहे. तर जिल्हा परिषदेकडूनही ‎याला दुजोरा दिला जात असल्याने, ‎मराठवाड्यातील शिक्षकांमधून ‎नाराजीचा सूर उमटत आहे. शासनाने ‎अग्रीम देणे गरजेचे आहे. ‎ शिक्षक संघटना करणार आंदोलन‎ शिक्षणाधिकाऱ्यांचा दुजोरा : शिक्षण उपसंचालक अनिल साबळे‎यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत आपल्याला‎कल्पना नाही असे सांगितले. तर शिक्षकांना अग्रिम मि‌ळणार नसल्याचे‎हिंगोलीचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सांगितले.‎

Share

-