मूर्तिजापूर येथे 50 फुट उंचीच्या रावणाचे दहन:वाजत गाजत राम, लक्ष्मण, हनुमानाची मिरवणूक

येथील आठवडी बाजाराच्या पटांगणात दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने सार्वजनिक दसरा उत्सव साजरा करून ५० फुट उंच रावणाचे दहन करण्यात आले. नागरिकांची मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबासह रावण दहन पाहण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, समितीचे सदस्य गुलाब दुबे, सदस्य बद्रीप्रसाद दुबे, कैलास महाजन, कोमल तायडे, सदस्य सुरेंद्र वरोकार, ज्ञानेश्वर गढवाले, संजय गुप्ता, कमलाकर गावंडे हाते. सूत्रसंचालन समितीचे सदस्य विलास नसले तसेच अमीत कंझरकर यांनी केले. दसरा मैदान स्वच्छता व अग्निशमन व्यवस्था नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. ठाणेदार जाधव यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. जुन्या शहरातून राम, लक्ष्मण आणि हनुमान यांची वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत सोहम टाक, लक्ष्मणाच्या भूमिकेत अनिकेत शिरभाते तर हनुमानाच्या भूमिकेत अंकुश अग्रवाल होते. वेशभूषा प्रकाश निरखे यांनी केली. मिरवणूक रावण दहन ठिकाणी आल्यानंतर राम, लक्ष्मण व हनुमान यांच्या हस्ते बाण मारून रावण दहन पार पडले.

Share

-