जन्माने नागरिकत्व हक्क संपुष्टात, आरोग्य संघटनेतूनही बाहेर:ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर 6 तासांत बायडेन सरकारचे 78 निर्णय फिरवले

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ६ तासांत बायडेन सरकारचे ७८ निर्णय फिरवले. यात अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या मुलांना आता जन्मत:च मिळणारे नागरिकत्व रद्द करण्यात आले. हा आदेश ३० दिवसांत लागू होईल. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या माता आणि पिता अमेरिकेचे नागरिक अथवा कायमस्वरूपी निवासी नव्हते अशा पालकांच्या मुलांना हा नियम लागू होईल, असे ट्रम्प यांनी सांगितले. याशिवाय बाळाच्या आईचे कायदेशीर वास्तव्य असेल परंतु ती अस्थायी असेल तरीही बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. सध्या अमेरिकेत १६ लाख भारतीय मुले आहेत. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेलाही (डब्ल्यूएचओ) सोडचिठ्ठी दिली आहे. हा आदेश १२ महिन्यांत लागू होईल. याचाच अर्थ अमेरिका आता एका पैशाचाही निधी देणार नाही. सध्या आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी पुरवठा होतो. २०२३ मध्ये या संस्थेच्या एकूण निधीपैकी २०% (सुमारे ११,११७ कोटी रुपये) वाटा अमेरिकेचा होता. अमेरिका संघटनेला खूप निधी देते, मात्र याचा इतर देश याचा लाभ अधिक घेतात, असे ट्रम्प वारंवार म्हणत आले आहेत. पहिल्या कार्यकाळातही ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता, परंतु बायडेन सरकारने तो फिरवला होता. ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशी २० थापा ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात एकूण ३०,५७३ थापा मारल्या होत्या. म्हणजे दररोज २१ वेळा ते खोटे बोलले होते. सीएनएननुसार, ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी २० थापा मारल्या. ट्रम्प इफेक्ट; सेन्सेक्स 1,235 ने कोसळला मुंबई|सेन्सेक्स मंगळवारी १,२३५ अंकांनी कोसळून ७५,८३८ वर बंद झाला. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता हे प्रमुख कारण होते. जपान, चीनचे बाजारही घसरले. एक्स्पर्ट : ब्रिक्स देशांत जगातील ७०% लोकसंख्या, मोठी बाजारपेठ पणाला जगातील ७०% लोकसंख्या ब्रिक्स देशात आहे. याचाच अर्थ अमेरिकी कंपन्यांच्या हातून मोठी बाजारपेठ जाईल. कारण अमेरिकेत कपडे,आैषधी,दागदागिन्यांसह आयात वस्तू अत्यंत महाग होतील. – पृथ्वीराज कोठारी, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असो. भारतासह ब्रिक्स देशांवर १००% कर लादण्याचा इशारा, परंतु सध्या तरी हे लागू करणे अवघड अधिसूचनेवरील आपली स्वाक्षरी दर्शवताना ट्रम्प आयातीवर 100% कर लावला तरीही भारतावर त्याचा फार तर २०% परिणाम होईल. भारताची घरगुती बाजारपेठच खूप मोठी आहे, पण अमेरिकेला असे करणे परवडणारे नाही – भरत गांधी, अध्यक्ष, इंडियन आर्ट सिल्क वीव्हिंग उद्योग महासंघ
अमेरिकी अर्थव्यवस्थेतील वृद्धीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. तथापि, इतर देशांनीही ‘जशास तसे’ धोरणाचा अवलंब केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होईल. – गीता गोपीनाथ, उपव्यवस्थापकीय संचालक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, द.आफ्रिका) देशांनी जागतिक व्यापारात डॉलरचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास या देशांवर १००% आयात कर लागू करण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी पुन्हा दिला आहे. २०२४ मध्ये भारताची अमेरिकेला निर्यात १५० अब्ज डॉलर्स होती, तर अमेरिकेतून भारताने ७५ अब्ज डॉलर्सची आयात केली होती. करवाढ झाल्यास निर्यातीच्या प्रमुख वस्तू उदा.कपडे,रत्न, दागिने,आयटी सेवा, आैषधी अमेरिकी बाजारात महाग होतील.

Share