परतीच्या पावसामुळे नुकसान, 79 हजार शेतकरी भरपाईसाठी प्रतीक्षेत:महसूल प्रशासनाकडून शासनाकडे 68 कोटींच्या मदतीची मागणी
सिल्लोड तालुक्यातील आठही मंडळांत अवकाळीसह परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सप्टेंबर महिन्यातील २ व ३ तारखेला अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून कृषी व महसूल विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त ७९ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शासकीय मदतीसाठी अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. परंतु दोन महिने उलटूनही सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नाही. याविषयी संबंधित विभागाला विचारणा केली असता अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. आचारसंहितेमुळे काम थांबले आहे. सप्टेंबर महिन्यात सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील नदीनाल्यांना मोठे पूर आले होते. यादरम्यान या नदी-नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने उभी पिके वाहून गेली. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी व इतर ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाई मिळावी म्हणून महसूल प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालय व सिल्लोड तहसील कार्यालयाच्या महसूल कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. यात तालुक्यातील आठही ^सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवर सर्व पंचनामे करून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. आचारसंहितेनंतर भरपाई मिळू शकते. – दुर्गेश गिरी, मदत व पुनर्वसन विभाग, तहसील कार्यालय, सिल्लोड मागील महिन्यात १४ ते २२ ऑक्टोबरदरम्यान तालुक्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे तालुक्यातील ३० हजार हेक्टर जमिनीतील पिके बाधित झाली. याबाबतचा अहवाल कृषी विभागाच्या वतीने महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. परंतु विधानसभा निवडणुका घोषित झाल्याने महसूल, कृषी विभागातील कर्मचारी निवडणूक कामात गुंतले. परिणामी महसूल प्रशासनाच्या वतीने या बाधित पिकांचा पंचनामा अद्याप करण्यात आलेला नाही. या ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांचे नुकसान मिळण्यापासूनही शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार असे दिसते. ^शिंदेफळ, केळगाव, मुर्डेश्वर, आमठाणा या परिसरात सतत पंधरा दिवस पाऊस सुरू राहिल्याने आमच्या कापूस व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मक्याला कोंब फुटले. कपाशीच्या कैऱ्या सडून गेल्या. निसर्गाच्या या कोपामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. यासाठी शासनाने तत्काळ मदत करावी. -सागर पंडित, शेतकरी, शिंदेफळ, ता. सिल्लोड मंडळांत ३३% पेक्षा जास्त म्हणजे ५० हजार १४७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून यामुळे १३१ गावातील ७९१२० शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना जिरायत जमिनीचे १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टरनुसार ६८ कोटी १९ लाख ९९ हजार २०० रुपयांची मदत मिळावी याबाबतचा अहवाल महसूल प्रशासनाच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु या मदतीबाबत अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने तालुक्यातील शेतकरी नुकसान होऊन दोन महिने झाले तरी मदतीपासून वंचित आहेत.